Gramsabha
Gramsabha

ग्रामसभेला सरपंच, सदस्यांचीच दांडी

सोमेश्वरनगर (पुणे) : मुरूम (ता. बारामती) ग्रामपंचायतीची मागील आठवड्यात तहकूब झालेली ग्रामसभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती; परंतु खुद्द सरपंचांसह बहुसंख्य सदस्य अनुपस्थित राहिल्याने आधीच तहकूब सभा पुन्हा तहकूब करण्याची नामुष्की आली. गावविकासाच्या पंचवार्षिक आराखड्याची महत्त्वपूर्ण सभा गांभीर्याने घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी "जमत नसेल तर सरपंचांनी राजीनामा द्यावा', असे स्पष्ट मत कामकाजात नोंदविले.

29 नोव्हेंबरला वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व "आपला गाव, आपला विकास' योजनेअंतर्गत पंचवार्षिक कृती आराखड्यास मंजुरी घेणे अशा महत्त्वाच्या विषयावरील ग्रामसभा तहकूब करावी लागली. आजच्या सभेसाठी सरपंचांच्या सहीने नोटिसा काढल्या होत्या, दवंडी देणारी गाडीही फिरविली होती; पण खुद्द सरपंच इंदुमती भगत व नऊ सदस्य अनुपस्थित राहिल्याने पुन्हा तहकुबीची नामुष्की आली. सोमेश्वर कारखान्याचे संचालक पी. के. जगताप, शरद चव्हाण, डॉ. मनोहर कदम, डॉ. राहुल शिंगटे, तालुका दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका आदी नोटीसप्रमाणे दहालाच उपस्थित होते. संतप्त ग्रामस्थांच्या सूचनेनुसार पावणेअकरापर्यंत नीलेश शिंदे व युसूफ इनामदार हेच उपस्थित राहिले. त्यामुळे "सरपंचांना जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा', असा ठराव ग्रामसेवक प्रकाश सोनवणे यांनी लिहिला व वाचून दाखविला. पी. के. जगताप यांनी ठराव मांडला, तर डॉ. मनोहर कदम यांनी अनुमोदन दिले.

सभेस अधिकारी पाठवू : प्रमोद काळे
सभेला सरपंच अध्यक्ष असतात. सदस्यांना कायदेशीर बंधन नाही; परंतु नैतिकदृष्ट्या हजर राहणे अपेक्षित आहे. ग्रामस्थांनी पत्र दिल्यास पुढील सभेला पंचायत समितीच्या वतीने अधिकारी पाठविता येतील, असे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले. उपसरपंच नीलेश शिंदे यांनी, आज जवळच्या नात्यातील दशक्रिया विधी असल्याने सरपंच अनुपस्थित होते. पाच-सहा सदस्य आले होते, असा खुलासा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com