'आरटीओ'मध्ये डिसेंबरपासून "सारथी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

वेब आधारित प्रणाली विकसित; सर्व कामे होणार ऑनलाइन
पुणे - वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे सादर करायची...त्यासाठीचे शुल्क भरायचे आहे... वाहनासंदर्भातील विविध प्रकारचे कर आणि शुल्क भरायचे आहेत... त्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) किंवा एजंटकडे जाण्याची गरज नाही. ही कामे आता ऑनलाइन करता येणार आहेत. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पंधरा डिसेंबरपासून "सारथी 4.0' या वेब आधारित प्रणालीचा वापर सुरू करण्यात येणार आहे.

परिवहन विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीद्वारे राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये जोडण्याची योजना आहे. प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर आणि वाशी आरटीओमध्ये या पूर्वी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आता पुणे आरटीओमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आरटीओतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली. आजरी यांनी नुकताच पुणे आरटीओचा पदभार स्वीकारला आहे.

एखाद्या व्यक्तीने नवीन वाहन खरेदी केल्यास, त्या वाहनाची नोंदणी आणि विविध करांचा भरणा, तसेच वाहनाला चॉइस नंबर हवा असल्याची त्याची प्रक्रियाही डीलर्सच्या ऑफिसमधून करणे शक्‍य होणार आहे. या प्रणालीमध्ये डीलर्सकरिता स्वतंत्र पर्याय देण्यात आला आहे. त्याद्वारे त्यांचे व्यवहार ऑनलाइन करता येणार आहेत. त्यासाठी डीलर्सना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पुढील काळात आरटीओकडून हाती घेण्यात येणाऱ्या योजनांबाबत माहिती देताना आजरी म्हणाले, 'स्कूल बस नियमावलीबाबत चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम आखली जाणार आहे. शाळांमध्येही या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस आहे. सध्या पाचशे, हजारच्या नोटा बंदीमुळे बाजारात सुट्या पैशांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही रिक्षाचालकांकडून "ई-वॉलेट'चा वापर केला जात आहे. रिक्षाचालकांनी या पर्यायाचा भविष्यातही वापर करावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आहे.''

ब्रेक टेस्ट दिवे येथे
आरटीओच्या दिवे येथील 25 एकर जागेत ब्रेक टेस्टिंग ट्रॅक उभारण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काळात वाहनांच्या ब्रेक टेस्टसाठी यापुढे दिवे येथे जावे लागेल, अशी माहिती आजरी यांनी दिली.

Web Title: sarthi process in rto