Drugs Case : कच्चा माल पुरविणाऱ्यापासून विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना मिळाली

ससून रुग्णालयातून मेफेड्रोन या अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे रॅकेट उघड झाल्यानंतर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी सात आरोपींची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली आहेत.
Sasoon-Hospital
Sasoon-HospitalSakal

पुणे - ससून रुग्णालयातून मेफेड्रोन या अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे रॅकेट उघड झाल्यानंतर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी सात आरोपींची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली आहेत. अमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्यापासून तयार झालेले पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सोमवारी (ता. १६) न्यायालयास सांगितले.

समाधान बाबाजी कांबळे, शिवाजी शिंदे, जिशान इक्बाल शेख, राहुल पंडित ऊर्फ, रोहितकुमार ऊर्फ अमितकुमार (सर्व रा. नाशिक), हरीश पंत, इम्रान शेख, गोलू (तिघेही रा. मुंबई) अशी या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ललित पाटील व त्याचे साथीदार नाशिक येथील एमआयडीसीमध्ये ज्या कारखान्यात मेफेड्रान तयार करीत होते तो कारखाना समाधान कांबळे याचा आहे.

शिवाजी शिंदे हा मेफेड्रान तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवीत. हरीश पंत, जिशान शेख आणि राहुल पंडित हे मेफेड्रॉन तयार करत. तर इम्रान शेख आणि गोलू हे दोघे तयार झालेल्या अमली पदार्थांची विक्री करत.

अटकेत असलेले आणि फरार असलेल्या आरोपींनी मेफेड्रान विक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह तपासादरम्यान येणाऱ्या विविध मुद्यांची चौकशी करायची आहे.

त्यामुळे भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या पोलिस कोठडीत आठ दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलम यादव-इथापे यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपींच्या कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

आरोपींना अद्याप अटक नाही हे पोलिसांचे अपयश :

नव्याने निष्पन्न झालेल्या आरोपींपैकी दोन आरोपी हे सध्या अटकेत आहेत. त्यांना या गुन्ह्यात अद्याप ताब्यात घेता आले नाही हे पोलिसांचे अपयश आहे. गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्‍यकता नाही, असा युक्तिवाद आरोपींचे वकील संदीप बाली यांनी केला.

आठ पेन ड्राईव्ह आणि तीन किलो सोने जप्त :

भूषण पाटील याच्या घरझडतीमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने आठ पेन ड्राईव्ह मिळून आले आहेत. तसेच अभिषेक बलकवडे याच्याकडून तीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मेफेड्रानच्या विक्रीतून आलेल्या पैशांतून ललित पाटील याने पाच किलो सोने घेतल्याचे अटक आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

सातपैकी दोन आरोपी अटकेत :

नव्याने निष्पन्न झालेल्यापैकी दोन आरोपी संध्या मुंबर्इत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटकेत आहेत. जिशान शेख आणि शिवाजी शिंदे असे या आरोपींची नावे आहेत. या दोघांना बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाच्या परवानगीने हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने आत्तापर्यंत १२ साक्षीदारांकडे तपास केला आहे.

या बाबींचा होणार तपास :

- कच्चा माल पुरविण्यात आणखी कोणाचा सहभाग

- मेफेड्रानच्या विक्रीतून आलेले पैसे आरोपींनी कशासाठी वापरले

- आरोपींनी अमली पदार्थ बनविण्याचे कोणी शिकवले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com