ससून रुग्णालय "पेशंट-फ्रेंडली' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे - ""सिटी स्कॅन काढण्यासाठी बेसमेंटमध्ये जा.. "एक्‍स-रे'साठी "बी-विंग'मध्ये जा''... अपघातानंतर किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही जर रुग्णांबरोबर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलात तर ही वाक्‍य सहजपणे सांगितली जातात... या सगळ्या धावपळीमध्ये सुरवातीच्या उपचाराचा महत्त्वाचा वेळ क्षणाक्षणाने निसटत असतो... पण आता किमान ससून रुग्णालयात असे चित्र तुम्हाला दिसणार नाही. कारण "ससून' आता "पेशंट-फ्रेंडली' झाले असून, "सीटी-स्कॅन', "एमआरआय' आणि "एक्‍स-रे' अशी सर्व अद्ययावत उपकरणे आता "कॅज्युअल्टी'मध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

रुग्णाच्या आजाराच्या अचूक निदानासाठी डॉक्‍टर "एमआरआय', "सिटी स्कॅन', "एक्‍स रे', "सोनोग्राफी' या आणि अशा वैद्यकीय चाचणी करण्याचा सल्ला देत असल्याचे आपण अनुभवले आहे. नियोजित शस्त्रक्रिया किंवा उपचार करताना आपली धावपळ होत नाही; पण अपघातात गंभीर जखमी रुग्णावर तातडीने उपचार करताना किंवा "कॅज्युअलटी'मध्ये आलेल्या बेशुद्ध रुग्णाला नेमके काय झाले आहे, याच्या निदानासाठी अद्ययावत वैद्यकीय उपकरणांची गरज असते. हॉस्पिटलच्या रचनेत ही उपकरणे वेगवेगळ्या कारणांमुळे "कॅज्युअल्टी'पासून दूर असतात. सध्या ससून रुग्णालयांमध्येही हाच अनुभव आपल्याला येतो; पण या पारंपरिक रचनेत बदल करत, ससून रुग्णालयाने "हायटेक कॅज्युअल्टी' निर्माण केली आहे. त्यातून "कॅज्युअल्टी'मध्येच अद्ययावत वैद्यकीय उपकरणे बसविण्यात आली आहेत. 

""राज्यातील पहिली "हायटेक कॅज्युअल्टी' ससून रुग्णालयात विकसित करण्यात आली आहे. रुग्णकेंद्री व्यवस्थेच्या दृष्टीने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. यासाठी आर. एम. धारिवाल ट्रस्टतर्फे मोलाचे सहकार्य केले आहे,'' 
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय 

रुग्णांना असा होणार फायदा 
- अवघ्या तीन मिनिटांमध्ये रुग्णाच्या आजाराचे नेमके निदान होऊन उपचार सुरू होतील. 
- वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये फिरवावे लागणार नाही. 
- उपचारांमधील वेळ वाचणार आहे. 
- डोक्‍याला जबरी मार बसलेल्या रुग्णावर तातडीने उपचार शक्‍य 

अशी झाली कॅज्युअल्टी हायटेक 
- सिटी स्कॅन, एक्‍स-रे, सोनोग्राफी एकाच ठिकाणी 
- रुग्ण आल्यानंतर प्राथमिक तपासणीपासून ते उपचारापर्यंतची जबाबदारी निश्‍चित 
- अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज उपकरणांची व्यवस्था 
- पाच खाटांचे आयसीयू आणि ट्रॉमा ऑपरेशन थिएटर 

दृष्टिक्षेपात ससून रुग्णालय 
- कॅज्युअल्टीमध्ये दिवसभरात येणारे रुग्ण - 400 
- बाह्य रुग्ण विभागातील रुग्ण - 2000 
- रुग्णालयात दाखल रुग्ण - 150 

Web Title: Sassoon Hospital Patient-Friendly pune