सासवड नगरपालिकेच्या जागेवरच अतिक्रमण  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

सासवड नगरपालिकेच्या सिटी सर्वे क्रमांक 127 गटावर नगरपालिकेने आरक्षण टाकले आहे. सासवड येथील काही लोकांनी आरक्षित असणाऱ्या गटावर कोणतीही परवानगी न घेता बांधकामाचा व टपऱ्या टाकण्याचा धडाका लावला आहे. 

गराडे (पुणे) : सासवड नगरपालिकेच्या सिटी सर्वे क्रमांक 127 गटावर नगरपालिकेने आरक्षण टाकले आहे. सासवड येथील काही लोकांनी आरक्षित असणाऱ्या गटावर कोणतीही परवानगी न घेता बांधकामाचा व टपऱ्या टाकण्याचा धडाका लावला आहे. 

सासवड येथील सिटी सर्वे क्रमांक 127 नगरपालिकेने आरक्षण क्रमांक 63 मध्ये विकली मार्केट आणि शॉपिंग सेंटर त्याचबरोबर 12 मीटर व 15 मीटर डीपी दोन रोड तसेच पुणे पंढरपूर 40 मीटर रोडणे बाधित झालेला आहे. उर्वरित जागा ही सार्वजनिक वापरासाठी दर्शवला आहे, असे आरक्षण असताना देखील स्थानिक नागरिकांनी मात्र असणाऱ्या गटावर राजरोसपणे घराची बांधकाम व टपऱ्या टाकलेल्या आहेत. 

याबाबत बहुजन समाज पार्टीचे महासचिव सागर लक्ष्मण जगताप यांनी गट नंबर 127 मधील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याबाबत तहसीलदार व सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की सासवड नगरपालिकेने या गटावर आरक्षण टाकल्यामुळे आमची नाव सातबारामध्ये असून आम्ही आजपर्यंत कोणतेही बांधकाम केले नाही. तर स्थानिक रहिवाशांनी त्या जागेमध्ये अनधिकृतपणे बांधकामे व पाया भरलेले आहेत. तरी आठ दिवसांमध्ये ही अतिक्रमणे काढण्यात यावीत अशी मागणी केली आहे. 
 
सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. 30 दिवसांमध्ये अतिक्रमणधारकांना आपले लेखी म्हणणे व कागदपत्रे सादर करावी. ती सादर न केल्यास संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केली जातील. मुळातच या गटावर नगरपालिकेचे आरक्षण असल्यामुळे नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी दिलेली नाही 
- विनोद जळक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सासवड नगरपालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saswad encroaches on municipal premises