जिवंत अर्भकाला गाडणारे दोघेही गजाआड; सासवड पोलिसांचे मोठे यश

दत्ता भोंगळे
Saturday, 31 October 2020

अरबाज बागवान याचे २० वर्षीय तरुणी सोबत प्रेम संबंध होते. यातून या मुलाचा जन्म झाला. एका हॉस्पिटलमध्ये दोघे नवरा-बायको असल्याचे भासून त्यांनी डिलिव्हरी करून घेतली. यानंतर ''हे बाळ मी सांभाळतो'' असे म्हणून पीडित मुलीकडून हे अर्भक अरबाजने ताब्यात घेत इंगोले बरोबर घेऊन अर्भक गाडण्याचा प्रयत्न केला होता. ​

गराडे(पुणे) : आंबोडी ( ता. पुरंदर )  येथे तीन दिवसांपूर्वी एका दोन दिवसांच्या अर्भकाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना गजाआड करण्यात सासवड पोलिसांना यश आले आहे. न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना ५ दिवसांची बुधवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रेमसंबंधातुन हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंबोडी येथे बुधवारी (दि.२८)  वनविभागाच्या हद्दीलगत शेतामध्ये एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न दोघांकडून सुरू होता. मात्र, शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे तो फसला होता. या संदर्भात मनोज अशोक रणपिसे यांनी पोलीस ठाण्यास कळविले होते.     

दुखःद ! मुलाचा रांजणखळग्यात बुडून मृत्यू, वडिलांचे हृदयविकाराने निधन​

घटनेतील आरोपींची पोलिसांना कोणतीही प्रकारची माहिती किंवा पुरावे नव्हते. गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळवून पोलिसांनी शनिवारी या दोघांना गजाआड केले असून त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अरबाज बागवान याचे २० वर्षीय तरुणी सोबत प्रेम संबंध होते. यातून या मुलाचा जन्म झाला. एका हॉस्पिटलमध्ये दोघे नवरा-बायको असल्याचे भासून त्यांनी डिलिव्हरी करून घेतली. यानंतर ''हे बाळ मी सांभाळतो'' असे म्हणून पीडित मुलीकडून हे अर्भक अरबाजने ताब्यात घेत इंगोले बरोबर घेऊन अर्भक गाडण्याचा प्रयत्न केला होता. 

बाळासाहेबांच्या वेळी राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत पण आता पुण्यात : संजय राऊत

अरबाज इक्‍बाल बागवान (वय २३), अनिकेत संपत इंगोले (वय २३)' (दोघे रा. सासवड, ता. पुरंदर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या निर्देशानुसार सहायक निरीक्षक राजेश माने, महेश खरात, महेश उगले, राजेश कर्चे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पुढील तपास राजेश माने हे करीत आहेत.

 

ते आले...पिस्तुल दाखवले आणि भरदिवसा व्यापाऱ्याला लुटले; मुंढव्यात थरार!

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saswad police Two Arrested for buried the living infant