बसथांबे उरले नावालाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

सासवड रस्ता परिसरातील स्थिती; पीएमपी प्रवाशांची गैरसोय

फुरसुंगी - सासवड रस्त्यावरील सत्यपुरम ते मंतरवाडी चौकादरम्यान पीएमपीचे दहा बसथांबे आहेत. त्यांची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

सासवड रस्ता परिसरातील स्थिती; पीएमपी प्रवाशांची गैरसोय

फुरसुंगी - सासवड रस्त्यावरील सत्यपुरम ते मंतरवाडी चौकादरम्यान पीएमपीचे दहा बसथांबे आहेत. त्यांची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

भेकराईनगर परिसराच्या सव्वा लाख लोकसंख्येमुळे येथे बसप्रवाशांची संख्याही मोठी आहे. पीएमपी प्रशासनाने सासवड रस्त्याकडेला दहा बसथांबे उभारले आहेत. यातील अनेक बसथांब्यांमधील आसन व्यवस्था, साचलेला कचरा, भटक्‍या जनावरांचा वावर व तुटलेले पत्रे, यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

या थांब्यांतील आसन व्यवस्थेचे साहित्य गायब झाले आहे, तसेच काही थांब्यांसमोरूनच सांडपाणी वाहत असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, गवतही वाढले आहे. बस वेळापत्रकांचे फलक नावालाही शिल्लक राहिले नाहीत. उन्हाच्या वेळी भटकी जनावरे थांब्यांत बसून, आराम करतात व प्रवासी उन्हात थांबतात. बसथांब्यांशेजारील दुकाने, हॉटेल्स, घराचे ओटे यांचा आसरा प्रवाशांना घ्यावा लागत आहे. याबाबत पीएमपीच्या हडपसर डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

बस थांबते म्हणूनच याला थांबा म्हणावा लागतो. अन्यथा, येथे सुविधा नावालाही नाहीत. आसनांची सोयच नसल्याने बराच वेळ ताटकळत उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे.
- सदाशिव फुले, प्रवासी

या बसथांब्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक वेळा पीएमपी प्रशासनाकडे तक्रार केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पीएमपी प्रवाशांच्या संख्येत घट होत आहे. 
- विशाल काळे, विद्यार्थी

Web Title: saswad road bus stop condition