सासवड शहराला लवकरच दोन दिवसाआड पाण्याची चिन्हे

श्रीकृष्ण नेवसे 
मंगळवार, 19 मार्च 2019

सासवड - सध्या दुष्काळी परिस्थितीने सासवड शहरास वीर धरणातून पाणी खात्रीशीर राहीले आहे. घोरवडी जलाशय घटल्याने त्याचे पाणी कालच बंद झाले. त्यामुळे कोणत्याही क्षणी.. दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड नळाव्दारे पाणी देण्याची वेळ येणार आहे. त्यातूनच सासवडकर नागरीकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष व पाणी पुरवठा समितीचे सभापती संजयअण्णा जगताप यांनी आज केले आहे. 

सासवड - सध्या दुष्काळी परिस्थितीने सासवड शहरास वीर धरणातून पाणी खात्रीशीर राहीले आहे. घोरवडी जलाशय घटल्याने त्याचे पाणी कालच बंद झाले. त्यामुळे कोणत्याही क्षणी.. दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड नळाव्दारे पाणी देण्याची वेळ येणार आहे. त्यातूनच सासवडकर नागरीकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष व पाणी पुरवठा समितीचे सभापती संजयअण्णा जगताप यांनी आज केले आहे. 

सध्या सासवड (ता. पुरंदर) शहरास गराडे जलाशयाकडून होणारा पाणी पुरवठा बंद आहे. जलाशयाखालील विहीरीचाही पुरवठा थांबला आहे. सिध्देश्वर जलाशयाचे पाणी यंदा घेतलेच नाही. तर घोरवडी जलाशयातून पाणी कालपर्यंत मिळत होते.. तेही आज बंद झाले. पाटबंधारे विभागाने `घोरवडी`वर बाकी गावे अवलंबून असल्याने सासवडने पाणी घेणे बंद करावे व वीरचे पाणी वापरावे, असे पत्राव्दारे नुकतेच स्पष्ट केले होते.

तरीही घोरवडीचे 15 लाख लिटर्स पाणी मिळण्यासाठी तहसीलदारांकडे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. त्यामुळे वीर धरणाच्या पाण्यावर यापुढे अधिक अवलंबून राहावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे. वीर धरणाहून चोवीस तासात अपेक्षित 45 लाख लिटर्स एवढा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहराचा नळाव्दारे होणारा दिवसाआडचा पाणी पुरवठा होतो आहे. घोरवडीचे पाणी बंद झाल्याने शहराचा पाणी पुरवठा लवकरच दोन दिवसाआड करावा लागण्याची चिन्हे आहेत. तरीही भविष्यातील टंचाईचा सामना करण्यास नागरीकांनी तयारी ठेवावी, असे पाणी पुरवठा समितीचे सभापती संजयअण्णा जगताप म्हणाले. 

यानिमित्ताने पालिका पाणी पुरवठा केंद्रावरच बैठक झाली. त्यात संजयअण्णा जगताप यांच्यासह नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप व इतरही नगरसेवक, मुख्याधिकारी विनोद जळक, पाणी विभागाचे रामानंद कळसकर, प्रविण कोरडे, माऊली गिरमे उपस्थित होते. त्यानंतर सकाळ ला माहिती देताना ते आज बोलत होते. शहरातील पाणी समस्याही नगरसेवकांकडून ऐकुण घेतल्या व त्यावर उपाययोजना सूचविली आहे.   

पाणी उधळपट्टीवर कारवाईसाठी पथके..
`सासवड शहरात कित्येक भागात टंचाईमुळे नळाव्दारे कमी दाबाने वा अपुरे पाणी येते, अशी तक्रार येत आहे. तर कित्येक भागात चांगले पाणी मिळते. तिथे वाहने धुणे, अंगणात पाणी मारणे.. अशी उधळपट्टी होते. हा प्रकार जिथे आढळेल.. तिथल्या रहीवास्यावर नळजोड तोडून कारवाई होईल.``
- संजयअण्णा जगताप, सभापती - पाणी पुरवठा समिती

Web Title: Saswad will soon get water after every two days