सासवडच्या चिंतामणी रुग्णालयाकडून गरजू संस्थांना आर्थिक मदत

श्रीकृष्ण नेवसे
गुरुवार, 7 जून 2018

सासवड (पुणे) - येथील नऊ डॉक्टरांच्या एकत्रित पुरंदर मेडीकल फौंडेशन संचलीत चिंतामणी रुग्णालयाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त.. विविध संस्थांना सुमारे 2.5 लाख रुपयांची मदत करण्यात आली. रुग्णालयाच्या या उपक्रमशिलतेबद्दल राज्यमंत्री विजय शिवतारे व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून रुग्णालय टिमचे कौतुक केले. 

सासवड (पुणे) - येथील नऊ डॉक्टरांच्या एकत्रित पुरंदर मेडीकल फौंडेशन संचलीत चिंतामणी रुग्णालयाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त.. विविध संस्थांना सुमारे 2.5 लाख रुपयांची मदत करण्यात आली. रुग्णालयाच्या या उपक्रमशिलतेबद्दल राज्यमंत्री विजय शिवतारे व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून रुग्णालय टिमचे कौतुक केले. 

सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात या रुग्णालयाच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. मनिष माचवे यांचे खास व्याख्यान नागरीकांसाठी आयोजित केले होते. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय पाटील व स्वच्छतेत झळकलेल्या नगरपालिकेचा गौरव प्रतिनीधी मोहन चव्हाण, संजय पवार यांचा सत्कारातून करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संजय जगताप, रुग्णालयाचे संचालक डॉ दिलीप वाघोलीकर, डॉ विनायक बांदेकर, डॉ भालचंद्र दिक्षीत, डॉ संजय रावळ, डॉ संध्या खळदकर, डॉ संजीव शिंदे, डॉ भास्कर आत्राम, डॉ लक्ष्मण वांढेकर, कृष्णा शेट्टी, मुख्याधिकारी विनोद जळक आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ प्रकाश आमटे यांच्या हिमलकसा आश्रमास 1 लाख रुपये, डॉ विकास आमटे यांच्या कुष्ठरोग निर्मुलन संस्थेस 50 हजार, दिवे (ता. पुरंदर) येथील जीवनवर्धीनी विशेष मुलांच्या विद्यालयास 25 हजार रुपये, केंजरळे आश्रमास 25 हजार रुपये, कऱहा नदी संवर्धन प्रकल्पास 25 हजार रुपये, वटेश्वर सुधारणा प्रकल्पास 25 हजार रुपये मदत यावेळी स्वाधीन केली. 

राज्यमंत्री श्री. शिवतारे म्हणाले., उच्चशिक्षण घेतलेले डॉक्टर खरे तर शहरी भागात पैसा व शानसे राहण्याचे सोडून.. इथे सासवडला थांबून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देतायेत, हे कौतुकाचे आहे. एक तप पूर्ण झाल्याने आणखी सुविधा रुग्णालयात वाढवा. संजय जगताप म्हणाले. नऊ डॉक्टरांची सामुहिक शक्ती एक झाल्याने चांगली रुग्णसेवा एका छताखाली मिळते. डॉ. माचवे यांनी डॉक्टर व रुग्णांच्या संबंधांवर मत मांडले. सुसंवाद व एकमेकांना समजून घेतल्याने डॉक्टर व रुग्णांचे संबंध चांगले राहतील. असेही सांगितले. यावेळी सूत्रसंचालन डॉ सुरेखा शिंदे यांनी केले. तर डॉ बांदेकर यांनी आभार मानले.

Web Title: Saswad's Chintamani Hospital provides financial support to needy organizations