Rickshaw Fire Accident : सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावर रिक्षा जळून खाक

सातारा रस्त्यावरील सिटी प्रायीड समोरील भापकर पेट्रोल पंप देशमुख पेट्रोलियम पंपावर रविवारी दुपारच्या वेळी सीएनजी भरलेली रिक्षा अचानक पेटून लागलेल्या आगीत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.
satara road near bhapkar petrol pump rickshaw caught fire
satara road near bhapkar petrol pump rickshaw caught fireSakal

बिबवेवाडी : सातारा रस्त्यावरील सिटी प्रायीड समोरील भापकर पेट्रोल पंप देशमुख पेट्रोलियम पंपावर रविवारी दुपारच्या वेळी सीएनजी भरलेली रिक्षा अचानक पेटून लागलेल्या आगीत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.

गणेश बडदे वय 52 रा काकडे वस्ती रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी गेले होते, गॅस भरून झाल्यानंतर रिक्षा सुरु करताना रिक्षाच्या इंजिनने पेट घेतला, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात येत नव्हती, कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाला आगीबाबत त्वरित कळविले, जनता फायर स्टेशनचा बंब घटनास्थळी आले, फायरमन

निलेश माने, महेश वळवी, प्रशांत कुंभार, निरंजन घोरपडे, मदतनीस सागर इंगळे, अजित लांडगे , ऋषिकेश बिबवे यांच्या पथकाने आग त्वरीत अटोक्यात आणली तोपर्यंत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली होती.

रिक्षाला आग लागण्याची घटना घडत असताना पंपावर अनेक वाहने इंधन भरण्यासाठी उभी होती सर्व वाहने त्वरीत पंपा बाहेर काढण्यात आली, सातारा रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com