

Questions are being raised after large-scale pruning of trees on Pune's Satara Road, with the civic administration yet to clarify whether permission was granted.
Sakal
पुणे : शहरात रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांचे संवर्धन केले पाहिजे यासाठी नागरिक प्रयत्न करत असताना दुसरीकडे सातारा रस्त्यावर जवळपास १५ झाडांची छाटणी केली आहे. त्यापैकी ११ झाडांचे केवळ बुंधे शिल्लक आहेत. ही झाडे छाटण्यास परवानगी दिली आहे का? असे विचारल्यानंतर दोन दिवस झाले तरी त्याचे उत्तर प्रशासनाला देता आले नाही. त्यामुळे ही वृक्षतोड बेकायदा आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.