
पुणे : राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर तिसरी, सहावी आणि नववीचे विद्यार्थी गणित तसेच अन्य विषयांच्या तुलनेत भाषांमध्ये जास्त सरस आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) परख राष्ट्रीय सर्वेक्षणात हे प्रकर्षाने दिसून आले. देशात महाराष्ट्र आठव्या स्थानावर असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, जालना हे जिल्हे सर्वोत्तम ठरले आहेत.