

Maharashtra Drought Crisis Satej Patil Demands Full Crop Loan Waiver and Slams Government Over Delay in Drought Trigger Activation
sakal
पुणे : सरकारला ‘एल निनो’चे संकट आधीच माहीत होते. तर शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या वेळी सूचना द्यायला हवी होती. दुष्काळाचा पहिला ट्रिगर सरकारने लागू करायला उशीर केला. कर्जाचे पुनर्गठन करणार असे सरकारने सांगितले पण त्याचा उपयोग नाही. सरकारने पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली. शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ आली असून, सरकारी उपाययोजना तोकड्या आहेत. शेतकऱ्यांचे पीक कर्ज संपूर्ण माफ करावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी रविवारी पुण्यात केली.