आयर्नमॅन सतीश ननवरे यांचा भिगवण येथे सत्कार

Satish Nanvere felicitated at Bhigavan Pune
Satish Nanvere felicitated at Bhigavan Pune

भिगवण - येथील कला महाविदयालयांमध्ये सायकल क्लब व महाविदयालय यांचे संयुक्त विदयमाने ऑस्ट्रिया येथील आयर्नमॅन स्पर्धेतील विजेते सतीश ननवरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आयर्नमॅनची मदनवाडी चौफुलापासुन येथील महाविदयालयांपर्यत सायकलवरुन मिरवणुक काढण्यात आली.  

येथील कला महाविदयालयांमध्ये ऑस्ट्रिया येथील आयर्नमॅन स्पर्धेतील विजेते सतीश ननवरे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव होते. बारामती सायकल क्लबचे अध्यक्ष अॅड. श्रीनिवास वायकर, सुजित पराडकर, सुरेश परकाळे, सायकल क्लबचे संजय चौधरी, रोटरीचे अध्यक्ष कमलेश गांधी, डॉ. जयप्रकाश खरड, केशव भापकर प्राचार्य भास्कर गटकुळ उपस्थित होते. कला महाविदयालय व सायकल क्लबच्या वतीने श्री. ननवरे यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारमुर्ती सतीश ननवरे म्हणाले, महाविदयालयीन युवकांनी ध्येय ठेवून कार्य केल्यास यश निश्चित मिळते. आरोग्य हीच संपत्ती या भावनेने मी सुरुवातीस सायकल चालविण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऑस्ट्रिया येथील आयर्नमॅन स्पर्धेविषयी माहिती मिळाली व त्यामध्ये सहभागी होण्याचा निश्चय घेतला. जगभरातील तीन हजार स्पर्धकामध्ये भारत देशाची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली याचे समाधान आहे. तरुणांनीही अरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सायकलकडे वळावे व त्यामाध्यमातून देशाचे नाव उज्वल करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश जाधव म्हणाले, कोणतीही स्पर्धा जिंकायची असेल तर सातत्य खुप महत्वाचे आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर जागतिक स्पर्धा कशी जिंकता येते याचे उत्तम उदाहरण सतीश ननवरे यांनी तरुणांसमोर ठेवले आहे. तरुणांनी श्री. ननवरे यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.

सायकल क्लबच्या वतीने महाविदयालयाच्या मैदानामध्ये वृक्षारोपन करण्यात आले. संपत बंडगर, भास्कर गटकुळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रणजित भोंगळे यांनी केले सुत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले आभार प्रा.संदीप साठे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन रियाज शेख नामदेव कुदळे, नितीन चितळकर, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. पद्ममाकर गाडेकर, डॉ. संकेत मोरे, अमोल शिंदे, अर्जुन तोडकर, अकबर तांबोळी  कुलदिप ननवरे आदींनी परिश्रम घेतले.

भिगवण सायकल क्लबचे काम कौतुकास्पद - अॅड. वायकर
बारामती सायकलने तीन चार सदस्यांपासुन सुरुवात केली होती आत्ता क्लबचे तीनशे सदस्य आहेत. येथील भिगवण सायकल क्लबच्या माध्यमातून सायकल चालविण्याबरोबरच आठवड्यातुन एकदा वृक्षारोपनही करण्यात येते. सायकल चालविण्याने आरोग्य चांगले रहाते तर वृक्षारोपनाने पर्यावरणाचे संरक्षण होते. भिगवण सायकल क्लबच्या माध्यमातून आरोग्याविषयी व पर्यावरणाविषयी सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com