बारामतीचे सतीश ननवरे बनले पुन्हा आयर्न मॅन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

बारामती : बारामतीच्या सतीश ननवरे यांनी स्विझरलँड येथील झुरीच येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत दुसऱ्यांदा यश संपादन केले. आज संपलेल्या या स्पर्धेमध्ये सतीश ननवरे यांनी 14 तास 17 मिनिटांची वेळ नोंदविली. 

सतीश ननवरे बारामती सायकल क्लब व एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडियाचे सदस्य आहेत.  ही स्पर्धा पूर्ण करताना ऐन वेळेस त्यांच्या सायकलचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे ही स्पर्धा पूर्ण करताना त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले मात्र, तरीही आलेल्या अडचणींवर मात करत त्यांनी यशस्वीपणे ही स्पर्धा पूर्ण केली. 

बारामती शहरातून सतीश ननवरे हे पहिल्यांदाच आयर्न मॅन झालेले आहेत. सायकलिंग, स्विमिंग व रनिंग अशा तीन प्रकारात ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. जगभरातील अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात. स्पर्धेचे संयोजन समितीने सतीश ननवरे यांना ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पदक व प्रशस्तीपत्रक प्रदान केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satish nanware from again win iron man competition in switzerland