वाहतूक कोंडीचा शनिवार! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता, लष्कर परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

पुणे : रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे, त्यांत साचलेले पावसाचे पाणी आणि विविध चौकांमध्ये बंद पडलेल्या सिग्नलमुळे 
शनिवारी शहरातील वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला. मातंग संघर्ष समितीच्या महामोर्चामुळे वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलाचा परिणामही वाहतुकीवर झाला, त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी पादचाऱ्यांसह वाहनचालकांचे मोठे हाल झाले. 

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता, लष्कर परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विविध चौकांमधील बंद पडलेल्या सिग्नलमुळे वाहतूक विस्कळित झाली, तरी वाहतूक पोलिस कुठेही दिसत नव्हते.

महामोर्चामुळे पुणे रेल्वे स्टेशनकडे जाणारे सर्व रस्ते सकाळी अकरापासून नागरिकांनी गजबजलेले होते. या रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र मार्गांवर वळविण्यात आली होती. दरम्यान, सकाळी संगमवाडी पुलाचा कठडा तोडून एक ट्रक मुठा नदीत पडल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. तसेच, पीएमपीची बस बंद पडल्यामुळे कोंडीत आणखी भर पडली. 

Web Title: Saturday was of Traffic Jam