'सवाई' यंदा महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार

250px-Sawai_Gandharva_Bhims.jpg
250px-Sawai_Gandharva_Bhims.jpg

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ''सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' यंदा दि. १२ ते १६ डिसेंबर या काळात मकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली आहे.

गेली बत्तीस वर्षे हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होत असे. यंदा सोसायटीने शाळेची जागा महोत्सवासाठी देता येणार नाही, असे लेखी पत्र दिल्यामुळे जागेतील हा बदल करण्यात येत आहे. यानंतर पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था महोत्सवास मनापासून आणि विनाअट मदत करण्यास तयार असल्याचेही चित्र यामुळे समोर आले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिाजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले. जागाबदलाच्या निमित्ताने या सगळ्या भावनांची उजळणी झाली, असेही जोशी यांनी नमूद केले.

महाराष्ट्रीय मंडळाशी भीमसेनजींचा दीर्घकाळ अतिशय निकटचा संबंध होता. मंडळाच्या विविध उपक्रमांत ते सहभागीही होत असत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळास मुकुंदनगर येथील क्रीडा संकुलातील मैदान या महोत्सवासाठी देण्याचे अगत्याने मान्य केले. 

''हा महोत्सव दरवर्षीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होईल आणि त्यासाठी गेली पासष्ट वर्षे रसिक, हितचिंतक आणि प्रायोजक यांच्याकडून जे सहकार्य मिळत आले, तसेच यापुढेही मिळेल, ''असा विश्वास श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com