वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पशुवैद्यक आवश्यक 

दत्ता म्हसकर
शनिवार, 28 एप्रिल 2018

जुन्नर मध्ये बिबट निवारा केंद्रात काम करताना पशु वैदयकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख यांनी अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला. या क्षेत्रात  नवीन व तरुण लोकांची गरज आहे. त्यासाठी सरकारने वनविभागात एक वेगळ पद तयार करण्याची वेळ आली आहे यात शंका नाही.

जुन्नर : दिवसेंदिवस मानव प्राणी संघर्ष वाढत चालला असल्याची अनेक उदाहरणे आहेत. वन्यजीवाच्या दृष्टीने पशुवैद्यक शास्त्र महत्वाचे आहे मात्र या क्षेत्रात खुप कमी लोक काम करत असल्याचे दिसत आहे. वाढत्या मानव प्राणी  संघर्षाच्या दृष्टीने वन्यजीव पशुवैद्यकाची भूमिका व काम भविष्यात फार उपयुक्त ठरणार आहे असल्याचे मत जागतिक पशुवैद्यकीय दिनाचे निमित्ताने डॉ.अजय देशमुख यांनी व्यक्त केले।
एकीकडे वन्यजीव संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे वनविभागाकडे पशुवैद्यक पद उपलब्ध नाही. एक पशुवैद्यक वन्यजीव संवर्धन, उपचार व योग्य निर्णय घेऊ शकतो परंतु वनविभागात असे पद नसल्याने असे होताना दिसत नाही. 

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानव वन्यप्राणी संघर्ष दिसतो. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे हत्ती, नागपूर कडे वाघ, मेळघाट,अमरावतीला अस्वल, तर जुन्नरला  बिबट मानव संघर्ष होताना दिसत आहे. परंतु त्या तुलनेत वन्यजीवासाठी पशुवैद्यकीय हॉस्पिटल किती आहेत ? त्या करीता वन्यजीव पशुवैद्यक किती आहेत हा मोठा प्रश्न आहे. यामुळे आजही आपल्याला वन्यजीव उपचारासाठी बरेच दूरवर जावे लागते व यात बऱ्याच वेळा त्या प्राण्याला आपला जीव गमवावा लागतो.या सर्व बाबीचा जागतिक पशुवैधक दिनाचे निमित्ताने विचार होण्याची आवश्यकता आहे.

जुन्नर मध्ये बिबट निवारा केंद्रात काम करताना पशु वैदयकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख यांनी अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला. या क्षेत्रात  नवीन व तरुण लोकांची गरज आहे. त्यासाठी सरकारने वनविभागात एक वेगळ पद तयार करण्याची वेळ आली आहे यात शंका नाही.

माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात सुरवातीला पशुवैद्यक नव्हता, परंतु हे पद आल्याने आज डॉक्टर केवळ पशुवैद्यकीय उपचार करित नाहीत तर याबरोबरबिबट्याची सुटका करणे, बछड्याची काळजी घेऊन परत आई कडे सुपूर्त करणे, लोकांमध्ये किंवा शाळा महाविद्यालयात जाऊन जनजागृती करणे या सर्व बाबी ते करत असताना दिसतात. म्हणजेच एक पशुवैद्यक असला तर वनविभागाला खऱ्या रुपात वन्यजीव संवर्धन करता येईल यात शंका नाही.

Web Title: save animal movement