पर्यावरण रक्षणासाठी देशी झाडांची लागवड करा

संतोष आटोळे 
बुधवार, 4 जुलै 2018

शिर्सुफळ (पुणे) : सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वड, पिंपळ, चिंच या सारख्या देशी झाडांची लागवड करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी केले.

शिर्सुफळ (पुणे) : सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वड, पिंपळ, चिंच या सारख्या देशी झाडांची लागवड करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी केले.

कटफळ (ता.बारामती) येथे महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत आयोजित वृक्षारोपण प्रसंगी निकम बोलत होते.यावेळी  करून प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, अग्नीशामक दलाचे मोटे साहेब, विस्तार अधिकारी मारकड, सरपंच सारिका मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यानिमित्त कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळा व जानाई मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. गावामध्ये यापूर्वीही 3000 झाडे रस्त्याच्या कडेला लावलेली आहेत. या झाडांची निगा राखण्यासाठी रोजगार हमी योजनेतुन 13 महिला मजुर काम करत आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने झाडांना टॅकरने नियमित पाणी दिले जात आहे. हेमंत निकम यांनी गावच्या या पर्यावरण रक्षणाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुकिंद मदने, रेखा आटोळे, सुजाता झगडे, कस्तुरा कांबळे, सोसायटीचे चेअरमन कांतीलाल आटोळे, बबन कांबळे, भारत मोकाशी, रविंद्र कांबळे, बाळासो आटोळे, ग्रामसेवक अमोल घोळवे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तु हारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: for save environment plant tree