‘विमानतळामधून बागायती क्षेत्र वाचविणार’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

विमानतळाच्या प्रकल्प अहवालामध्ये एकूण जमिनीच्या ३० ते ३५ टक्के बागायती जमीन विमानतळासाठी संपादित केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून प्रधान सचिव, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल. शेतकरी व जमीन गुंतवणूकदारांना मोबदला मिळवून देणे आणि कमीत कमी खर्चामध्ये विमानतळ उभाण्यासाठीही प्रयत्न करणार आहे.
- विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री

पुणे - ‘‘पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी तयार केलेल्या पॅकेजच्या चार पर्यायांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. विमानतळ होणे अत्यंत गरजेचे असले, तरी भूसंपादनात कमीत कमी बागायती जमीन जावी, यासाठी प्रयत्न करणार आहे,’’ असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी सांगितले.

नवीन शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘विमानतळासाठी पुरंदरमधील पाच गावांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी पॅकेजच्या चार पर्यायांना मान्यता दिली आहे. परंतु भूसंपादनामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाऊ नयेत, तसेच पडीक जमिनीला योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठीही मी प्रयत्नशील आहे.’’

Web Title: Save the horticultural area from the airport