Pahalgam Attack : दहा मिनिटे उशिराने पोहोचलो अन् बचावलो; काश्मीरला गेलेल्या पर्यटकांचे अनुभवकथन, झेलम एक्स्प्रेसने पुण्यात दाखल
Pune Tourist : पुण्याहून काश्मीरला गेलेल्या पर्यटकांना पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला. मात्र, फक्त दहा मिनिटांच्या उशिराने पोहोचल्यामुळे ते बचावले.
पुणे : गुलमर्ग, सोनमर्ग पाहून झाले होते. मंगळवारी पहलगामच्या बैसरन घाटीत जाण्याचे ठरले. श्रीनगरहून पहलगामच्या दिशेने निघालो. वाटेत भूक लागली म्हणून एका हॉटेलच्या ठिकाणी थांबलो.