
Pune Latest News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील भोजन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २२ जुलै रोजी विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात आळ्या आढळल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.