esakal | ऑनलाइन गोंधळ! चार विषयांचे पेपर दिले पण दिसतात तीनच; 'लॉ'चे विद्यार्थी टेन्शनमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

pune university

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एलएलबी तृतीय वर्षाची परीक्षा घेतली, विद्यार्थ्यांनी चार विषयांचे पेपर सोडवले. मात्र, आता तीनच विषयांचा पेपर सोडविल्याच ऑनलाइन दाखवले जात आहे.

ऑनलाइन गोंधळ! चार विषयांचे पेपर दिले पण दिसतात तीनच; 'लॉ'चे विद्यार्थी टेन्शनमध्ये

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एलएलबी तृतीय वर्षाची परीक्षा घेतली, विद्यार्थ्यांनी चार विषयांचे पेपर सोडवले. मात्र, आता तीनच विषयांचा पेपर सोडविल्याच ऑनलाइन दाखवले जात आहे. हेल्पलाइनवर तक्रार केली असली तरी समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा टेंशनमध्ये आले आहेत. 

पुणे विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा सुरू ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यास सुरवात केली आहे. आत्यापर्यंत 2 हजार 400 पेक्षा जास्त विषयांची परीक्षा पार पडली आहे. उर्वरीत सुमारे 500 विषयांची परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असले तरी विद्यार्थ्यांपुढे नव्या समस्या उभ्या राहात आहेत. 

हे वाचा - अकरावी अॅडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन

एलएलबी तृतीय वर्षाच्या चार विषयांची परीक्षा नुकतीच झाली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी "प्रोसिजर कोड', "ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ', "कंपनी लॉ' आणि "क्रिमिनल जस्टिस सिस्टिम' या चार विषयांचे पेपर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सोडवून समबीट केले होते. त्यांच्या लॉगइनला तसे दिसत होते. मात्र, विद्यार्थ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा लॉगइन केले असता त्यांना 22 ऑक्‍टोबर रोजीचा "क्रिमिनल जस्टिस सिस्टिम' हा पेपरच तेथे दिसत नव्हता. उर्वरीत तिन्ही विषयांचे पेपर सबमीट म्हणून दाखविले जात होते. विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला असता लॉगइनवर चार ऐवजी तीन पेपरच का दाखवले जात आहेत याचे उत्तर मिळू शकलेले नाहीत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला ईमेलद्वारे तक्रार केली असून, त्यास अद्याप उत्तर आलेले नाही. 

"परीक्षेत विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी सोडविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. "क्रिमिनल जस्टिस सिस्टिम'चा पेपर सोडवून देखील तो दिसत नसला तरी विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांना न्याय दिला जाईल.'' 
- डॉ. अंजली कुरणे, अधिष्ठाता, मानवविज्ञान, पुणे विद्यापीठ

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विद्यार्थी दीपक भेंडे म्हणाला, ""ज्या दिवशी पेपर सोडवला तेव्हा चारही विषयाचे पेपर सबमीट झाल्याचे दाखवले जात होते. पण आज "क्रिमिनल जस्टिस सिस्टिम' हा पेपरची नोंद ऑनलाइन दिसत नाही. आमचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने लक्ष द्यावे.'' 
अजित घाडगे म्हणाला,""क्रिमिनल जस्टिस सिस्टिम'चा ऑफशन विषय आहे, माझ्या कॉलेजमधील अनेकांना हा प्रोब्लेम आला आहे.याबाबत विद्यापीठाने स्पष्टता दिली पाहिजे.'' 

loading image
go to top