पिंपळे सौदागर - पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली.
पिंपळे सौदागर - पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली.

विद्यार्थिनींनी केला सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव

पिंपरी - स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शहरासह परिसरात उत्साहाने साजरी झाली. यानिमित्त जनजागृतीपर व्याख्याने, स्पर्धा अशा उपक्रमांसह विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

ताम्हाणे विद्यालय
चिखली म्हेत्रेवस्ती येथील कै. विष्णूपंत ताम्हाणे विद्यालयाच्या वतीने बालिका दिन साजरा केला. व्यंकटेश वाघमोडे, मुख्याध्यापिका रंजना आव्हाड उपस्थित होते. स्नेहा घोडे व धनश्री घोडे या बालिकांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. राखी धनोकार व सायली बिचुकले या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. साधना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती दगडे यांनी आभार मानले.

पी. के. इंग्लिश स्कूल
पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर यांनी फुले यांच्या कार्याची माहिती दिली. ‘स्त्री शिक्षणाचे महत्त्व’, ‘बेटी बचाव-बेटी पढाव’, ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा झाल्या. या वेळी पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर उपस्थित होते. वृषाली वनकर व सुप्रिया कोमपेल्ली यांनी सूत्रसंचालन केले.

शाहू महाराज विद्यालय
चिखलीतील शरदनगर येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात विद्यार्थ्यांनी फुले यांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी संस्थेचे सचिव लहू कांबळे, राजेंद्र साबळे, प्रा. सविता साबळे, मुख्याध्यापक बाबाजी शिंदे उपस्थित होते. स्वाती पाटील, देवेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विकास मस्के यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष कावळे यांनी आभार मानले. 

श्रमजीवी शाळा
भोसरीतील श्रमजीवी शाळेत परिपाठाच्या वेळी माध्यमिक विभागातील ऋतुजा मानखैर व साक्षी देवरे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. मुख्याध्यापिका ए. ए. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. सुनील भसे यांनी फुले यांच्याबद्दल माहिती दिली. संपत निवडुंगे यांनी सूत्रसंचालन केले. आभार मीनाक्षी तिडके यांनी मानले. 

घोलप महाविद्यालय
सांगवी येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयात दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘लग्न, नाते आणि सारे काही’ या विषयावर आयोजित मुक्त संवादात होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. ऊर्जिता कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, नाना शिवले, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. अपेक्षा जाधव, प्रा. सुवर्णा खोडदे, डॉ. वंदना पिंपळे, डॉ. क्रांती बोरावके उपस्थित होते.

कष्टकरी संघर्ष महासंघ
चिंचवडमध्ये कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने ज्येष्ठ कष्टकरी महिलांचा कार्यक्रम झाला. अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी मार्गदर्शन केले. या वेळी महिला समन्वयक माधुरी जलमुल्वार, वंदना थोरात, सोनाली देसाई, प्रभावती पाटील, पार्वती पटणे, सरूबाई वाघमारे, शीला शिंदे, सुलाबाई शिंदे, कमल कदम, लक्ष्मी हेळावार, कमल गायकवाड, ताई खांडेकर, मनीषा खेडकर, मालन काळे, मीना नवगिरे उपस्थित होत्या. अनिता देशमुख यांनी प्रास्ताविक केले. आभार अर्चना कांबळे यांनी मानले.

विद्यानिकेतन शाळा
बालगोपाल विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत संस्थापक-अध्यक्ष कैलास कुदळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. व्ही. सी. गायकवाड यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी विविध स्पर्धा झाल्या. एम. डी. शेकडे यांनी मार्गदर्शन केले. सीमा भोसले यांनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com