esakal | SPPU : अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी हवा धोरणात्मक निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Students did copy in online exams of RTMNU

SPPU : अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी हवा धोरणात्मक निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना साथीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्रात ३५० विद्यार्थ्यांनी, तर द्वितीय सत्रात तब्बल ७६१ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे पुढे आले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८० हूण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या परीक्षांसाठी आता धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विद्यापीठातील द्वितीय सत्राची ऑनलाइन परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये पार पडली. परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला होता. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुरावे पडताळून परिक्षा विभागाने विद्यार्थ्यांना अनफेअर मिन्स कमिटीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. कमिटीचे सदस्य तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले,‘‘प्रथम सत्राच्या तुलनेत द्वितीय सत्रात गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ही गांभीर्याची गोष्ट आहे. विशेषतः अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून, प्रथम वर्षासह शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे.’’ ७६१ कॉपीबहाद्दरांपैकी ७२५ विद्यार्थी अभियांत्रिकीचे असल्याचे डॉ. चासकर यांनी सांगितले आहे. विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेमधील गैरप्रकार पकडण्यासाठी ‘प्रोक्टॅर्ड पद्धती’चा वापर केला आहे. यासंबंधी वेळोवेळी विद्यार्थ्यांना सूचना केल्या आहेत. तरीही परीक्षेसंबंधीचे गांभीर्य विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही.

हेही वाचा: मुंबईतल्या स्थितीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

गैरप्रकार करण्याची पद्धत :

स्क्रिनशॉट किंवा फोटो काढून व्हॉट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुपवर टाकणे. मित्राला जवळ बसविणे किंवा पुस्तके पाहणे. मात्र हे करत असताना विद्यार्थ्याच्या हालचाली, मोबाईल किंवा लॅपटॉपवरील विंडोबदल टिपला जातो आणि विद्यार्थी पकडले जातात. काही वेळा कॅमेरॅची वायर कट करणे, कॅमेरा फिरविणे, आदी प्रकार कॉपीबहाद्दर अवलंबित असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात नवी रुग्णसंख्या, मृतांमध्ये मोठी घट

परिक्षेतील गैरप्रकार

सत्र : प्रथम : द्वितीय

परीक्षेचा कालावधी : एप्रिल - मे : जुलै-ऑगस्ट

परीक्षार्थी : ५.७९ लाख : ६ लाख

गैरप्रकार करणारे परीक्षार्थी : ३५० : ७६१

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण : २८० : ७२५

दुसऱ्यांदा गैरप्रकारामध्ये आढळल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यासारखी कडक कारवाई करावी लागेल. यामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रमाण असून, त्यांच्यासाठी आता वेगळ्या परीक्षापद्धतीचा विचार करणे आवश्यक आहे. कारण ही एक प्रकारची परीक्षा पद्धतीला लागलेली कीड आहे.

- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग

loading image
go to top