तपासणी यंत्रणाच हवी तपासायला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

पुणे - अभ्यास तर चांगला केला होता, पेपरही चांगला गेला, पण परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून तुम्हीही पुनर्मूल्यांकन केले असेल, हो ना? मग जरा इकडे लक्ष द्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुनर्मूल्याकंनासाठी अर्ज करून त्यात गुण बदललेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार वर्षात झपाट्याने वाढल्याचे निदर्शनास येते. पुनर्मूल्याकंनात २०१३मध्ये जवळपास १५ टक्के विद्यार्थ्यांचे गुण बदलले होते. आता २०१६ मध्ये हीच आकडेवारी ३६ टक्‍क्‍यांवर पोचली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणी यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे.

परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्याकंन करण्यासाठी अनेक विद्यार्थी अर्ज करतात. त्यासाठी शुल्कही भरले जाते. काहींचे पुनर्मूल्याकंनानंतर अपेक्षेप्रमाणे गुण वाढतात. तर अनेकांच्या पदरी निराशा येते.  असे असले तरीही विद्यापीठात गेल्या चार वर्षांत पुनर्मूल्याकंनानंतर गुणवाढ होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी एक महिन्यापूर्वी यासंदर्भातील माहिती मागविली होती. त्यानुसार अकाउंट जनरल यांनी विद्यापीठाचा तपासणी (इन्स्पेक्‍शन) अहवाल दिला आहे. त्यातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत विद्यापीठाची भूमिका जाणून घेण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटीमुळे अनेक विद्यार्थी नापास होतात आणि पुनर्मूल्यांकनात ते उत्तीर्ण झाल्याचे आढळून येते. हे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले असून, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी. पुनर्मूल्यांकनासाठीचे शुल्क करावे. उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांना पैसे वाढवून द्यावेत आणि त्यांची संख्याही वाढवावी.
- विहार दुर्वे, माहिती अधिकार कार्यकर्ते

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून परीक्षा मंडळ आणि पुनर्मूल्याकंन मंडळ आणि परीक्षा नियंत्रक यांच्या तज्ज्ञ समितीने गेल्या काही वर्षांत पुनर्मूल्यांकनात गुणांमध्ये बदल झालेल्या विद्याशाखा शोधल्या आहेत. त्यानुसार ‘मॉडरेशन’ पद्धतीत आवश्‍यक त्या सुधारणा केल्या आहेत. उत्तरपत्रिका तपासणीत जबाबदार असणाऱ्या प्राध्यापकांना नोटीस पाठविली जाते.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र. कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Savitribai Phule Pune University