SPPU Cancels Dean Recruitment Process
Sakal
पुणे
Pune University : SPPU अधिष्ठाता भरती रद्द! 'या' कारणामुळे विद्यापीठाची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवणार; नियुक्त्या आणखी लांबणार
SPPU Cancels Dean Recruitment Process : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार, आरक्षण निश्चितीतील बदल आणि नियमांमुळे जुलै २०२३ मध्ये काढलेली 'विद्याशाखा अधिष्ठाता' पदांची भरती प्रक्रिया रद्द केली असून, आता ही प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याने नियुक्त्या लांबणार आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘विद्याशाखा अधिष्ठाता’ पदांची जुलै २०२३ मध्ये जाहिरात काढून राबविलेली भरती प्रक्रिया रद्द केली आहे. या पदासाठी आता पुन्हा नव्याने जाहिरात काढण्यात आली आहे. याद्वारे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे नव्याने राबविण्यात येणार आहे. परिणामी, विद्यापीठाची गेल्या काही वर्षांपासून रखडलेली अधिष्ठातांची नियुक्ती प्रक्रिया आणखी काही काळ लांबण्याची शक्यता आहे.

