

Error in Income Tax Question Paper Sparks Fresh Exam Row at Pune University
sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार थांबण्याचे नावच घेत नाही. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच १०० गुणांचा पेपर ‘कॉपी-पेस्ट’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असताना, आता ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’च्या ‘इन्कम टॅक्स’ पेपरमध्ये झालेल्या गंभीर गोंधळामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.