देशाचे पहिले बीआयएस सौरउष्ण चाचणी केंद्र पुण्यात

Savitribai Phule Pune University has inaugurated the country's first Bureau of Indian Standards certified Solar Thermal Production Testing Center.
Savitribai Phule Pune University has inaugurated the country's first Bureau of Indian Standards certified Solar Thermal Production Testing Center.
Updated on

पुणे : सौर उत्पादनाचे प्रमाणीकरण (स्टॅंडर्डायझेशन) आता देशातच करणे शक्‍य होणार आहे. देशातील पहिल्या भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) प्रमाणित सौरउष्ण (सोलर थर्मल) उत्पादन चाचणी केंद्राचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागाच्या प्रादेशिक चाचणी आणि तंत्रज्ञान सहकार्य केंद्रातील (आरटीसी) या सुविधांचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सोलर थर्मल फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव जयदीप मालवीय, महाराष्ट्र सोलर मेनूफॅक्‍चरर असोसिएशन (एमएएसएमए) अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, महाऊर्जाचे व्यवस्थापकीय संचालक विनोद शिरसाठ, विभागाचे संचालक प्रा.संदेश जाडकर, प्रा.एस.व्ही.घैसास, प्रा. किरण देशपांडे, प्रा.एस.आय पाटील आदी उपस्थित होते. केंद्राच्या समन्वयक डॉ.अनघा पाठक यांनी प्रस्तावना केली तर डॉ. आदिनाथ फुंदे यांनी आभार मानले. 

प्रमाणीकरणाच्या (स्टॅंडर्डायझेशन) सुविधा 
 
- ग्लास निर्वात सौर नलिका संग्राहक आणि टाकी 
- संपूर्ण सौर जलतापक यंत्रणा 
- थर्मोसायफन प्रकारातील घरगुती सौर जलतापाक यंत्रणा 
- सौरचूल आणि सौर सपाट पट्टीका 

केंद्राची वैशिष्ट्ये 

- राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यायन बोर्ड (एनएबीएल) ने अधिकृत केले चाचणी केंद्र 
- सर्व सौर उत्पादनाचे भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) प्रमाणीकरण करता येणार 
-प्रमाणीकी कारणाबरोबरच ऊर्जा क्षेत्रातील संशोधन आणि विकासाचे काम चालणार 
- उत्पादनांना ऊर्जा बचतीचे बीईई मानांकनही मिळणार 

एमएसएमएचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले, आयात शुल्कात वाढ, बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि कोरोनाचा विपरीत परिणाम सौरतापक बाजारपेठेवर झाला आहे. सौरतापकाच्या संपूर्ण यंत्रणेसाठी बीआयएस प्रमाणीकरण अनिवार्य केल्याने निश्‍चितच बाजारपेठेला फायदा होणार आहे. 
 
सोलर थर्मल फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव जयदीप मालवीय म्हणाले, देशात बीआयएस प्रमाणीकरणासाठी प्रयोगशाळाच उपलब्ध नव्हत्या. या केंद्राच्या रूपाने ही सुविधा उपलब्ध झाली असून, आंतरराष्ट्रीय उत्पादकही भारतात गुंतवणूक करू शकतात. यामुळे बाजारपेठ स्थिर होण्यास मोठी मदत मिळणार आहे. 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, उद्योग आणि संशोधन संस्थांचे परस्पर सहकार्य कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरले पाहिजे. या प्रमाणीकरण केंद्राच्या निमित्ताने उद्योगांचा संशोधनात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे. प्रा.व्ही.जी.भिडे यांच्या दूरदर्शी विचारांतून उभ्या राहिलेल्या या विभागामुळे सौरउत्पादनांच्या बाजारपेठेला यामुळे चालना मिळणार आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com