esakal | Breaking : विद्यार्थ्यांनो, अंतिम वर्ष परीक्षेसाठी 'हे' दोन पर्याय उपलब्ध; आठवडाभरात वेळापत्रक जाहीर होणार!
sakal

बोलून बातमी शोधा

SPPU-Students

सर्व विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी ७ सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता.४) पुणे विद्यापीठाची परीक्षा मंडळाची बैठक पार पडली. 

Breaking : विद्यार्थ्यांनो, अंतिम वर्ष परीक्षेसाठी 'हे' दोन पर्याय उपलब्ध; आठवडाभरात वेळापत्रक जाहीर होणार!

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन हे दोन्ही पर्याय खुले ठेवले आहेत. मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमाचा वापर करावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच प्रथम बॅकलाॅग राहिलेल्या विषयांची परीक्षा होईल आणि त्यानंतर नियमित विषयांची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार कुलगुरूंच्या समितीने परीक्षा कशी घेता येईल याचा अहवाल सादर केला. त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गुरुवारी (ता.३) बैठक झाली. त्यामध्ये सर्व विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी ७ सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता.४) पुणे विद्यापीठाची परीक्षा मंडळाची बैठक पार पडली. 

दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत​

जे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षा देणार आहेत, त्यांचे आधीच्या वर्षातील किंवा सत्रातील काही विषय बॅकलॉग आहेत. अशांची परीक्षा ऑधी घेतील जाईल. त्यानंतर अंतिम वर्षाची मुख्य परीक्षा सुरू होतील. या सर्व परीक्षा ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहेत.

पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, "परीक्षेच्या नियोजनासंदर्भात शुक्रवारी परीक्षा मंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये अनेक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची बॅकलॉग आणि नियमित विषयांची परीक्षा घेण्याबाबत चर्चा झाली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षेत सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप अशी साधने नाहीत किंवा  इंटरनेटची व्यवस्था नाही अशांसाठी ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बॅकलाॅकची परीक्षा होईल यानंतर अंतिम वर्षाची परीक्षा होईल ही परीक्षा एम.सी.क्यू.पद्धती होईल. परीक्षेचे वेळापत्रक पुढील चार ते पाच दिवसांमध्ये जाहीर केले जाईल. 

विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये पाठवू नका; तंत्र शिक्षण सहसंचालकांचे शैक्षणिक संस्थांना आदेश​

एका तासाची अन ५० गुणांची परीक्षा
विद्यापीठाने यापूर्वी विद्या परिषदेच्या बैठकीत अंतिम वर्ष परीक्षा ही एका तासाची आणि ५० गुणांची घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आताही कायम असून त्याच पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच विद्यापीठाला आता पुन्हा एकदा विद्या परिषद व्यवस्थापन परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्याची गरज नाही त्यामुळे थोडीशी योजना कधी येणार आहे. 

'प्राॅक्टर्ड' प्रणालीचा वापर 
'प्राॅक्टर्ड' प्रणालीचा वापर करून अंतिम वर्षाची ऑनलाइन परीक्षा होईल. यामध्ये विद्यार्थ्याला घरात बसल्या बसल्या परीक्षा देता येईल, पण त्याने गैरमार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास रोखताही येऊ शकते. त्यामुळे परीक्षेचे महत्त्व कमी होणार नाही.

- पुढील ५ ते ६ दिवसात वेळापत्रक जाहीर होणार
- एका तासाची आणि ५० गुणांची एसीक्यू पद्धतीने परीक्षा
- विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन, ऑफलाईनचा पर्याय खुला
- पावणे तीन लाख विद्यार्थी देणार परीक्षा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)