esakal | विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये पाठवू नका; तंत्र शिक्षण सहसंचालकांचे शैक्षणिक संस्थांना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Office

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेचे कामे सुरू आहे. शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, पालक, विद्यार्थी तंत्रशिक्षण कार्यालयास भेट देत आहेत. त्यामुळे कार्यालयात गर्दी होत आहे.

विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये पाठवू नका; तंत्र शिक्षण सहसंचालकांचे शैक्षणिक संस्थांना आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेच्या निमित्ताने पुणे विभागातून अनेक विद्यार्थी, पालक त्यांच्या अडचणी घेऊन तंत्रशिक्षण कार्यालयात येत आहेत. त्याऐवजी संस्थांनी याचा पाठपुरावा करावा, असे आदेश सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी दिले आहेत.

पुण्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी घेतला धसका 

पुणे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयामार्फत पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील संस्थांचा कारभार पाहिला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेचे कामे सुरू आहे. शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, पालक, विद्यार्थी तंत्रशिक्षण कार्यालयास भेट देत आहेत. त्यामुळे कार्यालयात गर्दी होत आहे. 

जपान दूतावासाने पुणे महापालिकेचे टोचले कान; काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याबाबत सर्वांनी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या नियमाचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. मात्र ही स्थिती असतानाही शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून त्याचे पालन होत नाही. अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्था पुणे कार्यालयात जाण्यास सांगत आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. शिवाय संस्थांचे प्रतिनिधीही पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात येत आहेत. 

भाडेकरुने घरमालकाकडे केली ५० लाखाच्या खंडणीची मागणी अन्...; वाचा पुढे काय झालं ते!​

पदवी, पदव्युत्तर प्रवेशासंदर्भात काही अडचण असल्यास, त्यांनी तंत्रशिक्षण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. कागदपत्रे ई-मेलद्वारे सादर करावीत. कार्यालयास भेट देणे आवश्‍यक असल्यास त्याबाबत पूर्वपरवानगी घ्यावी. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी कार्यालयात येऊ नये, असे नंदनवार यांनी आदेशात नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image