
उर्दू शिकण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी, पदव्युत्तर, एमफील, पीएचडीचे विद्यार्थी अर्ज करू शकतील.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे उर्दू भाषेतील पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून (ता.13) सुरू केली आहे. प्रथमच अशा प्रकारचा अभ्यासक्रम हिंदी विभागांतर्गत सुरू करण्यात आला आहे.
पुणे विद्यापीठातील उर्दू पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 13 ते 27 जानेवारी अशी मुदत आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 30 इतकी असून, अर्जदारांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे.
- मोठी बातमी : बायडेन यांच्या शपथविधीवेळी दंगलीचा कट; FBI ने दिला अलर्ट
उर्दू शिकण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी, पदव्युत्तर, एमफील, पीएचडीचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतील. ऑनलाइन अर्जासाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना 500 रुपये, तर मागासवर्गीय गटांतील विद्यार्थ्यांना 350 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.
उर्दू भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडे सातत्याने मागणी होत होती. त्यास प्रतिसाद देत विद्यापीठाने हिंदी विभागप्रमुख डॉ. सदानंद भोसले यांच्या अध्यक्षतेसाठी समिती नेमली. या समितीने अभ्यासक्रमाची रचना तयार केली. त्यानंतर हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना उर्दू वाचन, उर्दू लेखन, उर्दू श्रवण आणि उर्दू संभाषण अशी चार कौशल्य शिकता येणार आहे.
- Breaking: काँक्रिट मशिनचा धक्का लागल्याने पुण्यात तरुणाचा जागीच मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना
अर्ज करण्याची मुदत - 13 ते 27 जानेवारी
पदविकेचा कार्यकाळ - एक वर्ष
प्रवेश क्षमता - 30
पात्रता - किमान 12वी उत्तीर्ण
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)