आरक्षण धोरणाची व्यवस्थित अंमलबजावणी करा; पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

मराठा समाजासह सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास (एसईबीसी) जागा आरक्षित ठेवण्याबाबत शासनाने ९ जुलैजुलै २०१९ रोजी परिपत्रक काढले आहे.

पुणे : नविन शैक्षणिक वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविताना आरक्षण धोरणाची काटेकोटपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना दिल्या आहेत. 

मराठा समाजासह सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास (एसईबीसी) जागा आरक्षित ठेवण्याबाबत शासनाने ९ जुलैजुलै २०१९ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यात 'एसईबीसी' वर्गास १२ टक्‍के जागा आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्‍के जागा आरक्षित ठेवणे राज्यातील सर्व विद्यापीठातील शिक्षण संस्थांना आवश्‍यक आहे. या आरक्षणाच्या तरतुदीनुसार कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे.

'राष्ट्रीय इंडियन मिलिटरी'च्या परीक्षेत पुण्याचा शुभम महांगरे चमकला!

राज्य शासनाने आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णय शैक्षणिक संस्थांतील प्रवेशामधील राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थाखेरिज सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, विधी विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, त्यांच्या संलग्नित असणारी सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालयांना राबविणे बंधनकारक आहे. याचाच आधार घेत शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने सर्व महाविद्यालयांना सूचित केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University instructed to affiliated colleges about implementation reservation policy