Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘रामलीला’ प्रकरणावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झुंडशाहीचा हल्ला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘रामलीला’ प्रकरणावरून घडला वाद हा धार्मिक नसून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झुंडशाहीने केलेला हल्ला आहे. पोलिसांनी शिक्षक आणि प्राध्यापकांना संरक्षण देण्याऐवजी त्यांनाच न्यायालयात सादर केले.
savitribai phule pune university ramlila case attack on freedom of expression protest
savitribai phule pune university ramlila case attack on freedom of expression protestSakal

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘रामलीला’ प्रकरणावरून घडलेला वाद हा धार्मिक नसून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झुंडशाहीने केलेला हल्ला आहे. पोलिसांनी शिक्षक आणि प्राध्यापकांना संरक्षण देण्याऐवजी त्यांनाच न्यायालयात सादर केले.

ही एक प्रकारची दडपशाही असल्याचा आरोप पुण्यातील पुरोगामी आणि लोकशाही वादी संघटनांनी केला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलल्या ‘जब वुई मेट’ या रामलीलेशी निगडीत नाटकामुळे मोठा वाद निर्माल झाला आहे.

नाटकातील आक्षेपार्ह संवाद आणि सादरीकरणाबद्दल आक्षेप घेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नाटक बंद पाडले आणि आंदोलनही केले. एक प्रकारे ही सत्ताधाऱ्यांची दडपशाही असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे, अशी भूमिका लोकशाहीवादी संघटनांनी घेतली आहे.

त्यानिमित्त शहरात निदर्शनांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज, नव समाजवादी पर्याय, नौजवान भारत सभा, लोकशाही उत्सव समिती आदींच्या वतीने ‘जवाब दो’ हे आंदोलन करण्यात आले.

लोकशाही उत्सव समितीच्या मनिषा गुप्ते यांनी हा दडपशाहीचा प्रकार असून, याला सरकारचे संरक्षण असल्याचे म्हटले. तर मिलिंद चंपानेरकर म्हणाले, ‘‘शिक्षण संघटनांवर जाणीवपूर्वक हल्ला करण्यात येत असून, याची पोलिसांनी गंभीर दखल घ्यायला हवी.

विद्यापीठातील ललित कला केंद्राबरोबरच एफटीआयआयमध्ये लागोपाठ अभाविप हल्ला करत आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे.’’ नाटकाबद्दल आक्षेप नोंदविण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मार्ग खुला होता, असे असतानाही नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणे दडपशाही असल्याचे आंदोलकांनी म्हटले.

घडलेल्या प्रकाराचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नसून, केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे वातावरण तयार केले आहे. एफटीआयआय आणि ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांच्या आम्ही पाठीशी आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com