
विद्यापीठातील विविध विभागात आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना राबविली जाते.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कमवा शिका योजनेत निधी वाटप करताना महाविद्यालयांवर अन्याय केला जात आहे. पाच हजार विद्यार्थी शिकणाऱ्या विद्यापीठासाठी अडीच कोटी तर तब्बल पाच लाख विद्यार्थी शिकणाऱ्या संलग्न महाविद्यालयांसाठी केवळ साडे चार कोटीची तरतूद केली आहे. हा दुजाभाव का करता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यावर्षी जास्त निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत केली.
- #BoycottChina : पुण्यातील 'या' नामांकित संस्थेनेही टाकला चीनी वस्तूंवर बहिष्कार!
विद्यापीठातील विविध विभागात आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज ३ ते ४ तास विविध कामे दिले जातात. या कामाचा मोबदला म्हणून विद्यार्थ्यांना मानधन दिले जाते. त्यातून भोजनालय अथवा अन्य खर्च विद्यार्थ्यांकडून भागविला जातो. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.
- पुण्यातील शास्त्रज्ञांनी शोधली दुर्मिळ आकाशगंगा; कसं आहे तिचं स्वरुप?
विद्यापीठाने अधिसभेत गुरूवारी (ता.२५) अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर यांनी कमवा व शिका योजनेची तरतूद महाविद्यालयांसाठी अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. महाविद्यालये विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देतात, पण त्यांना कमवा व शिका योजनेसाठी निधी दिला जात नाही. विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात ५ हजार विद्यार्थी शिकतात, पण त्यांच्यासाठी अडीच कोटीची तरतूद आहे.
- वीजबिलांच्या तक्रारींसाठी 'महावितरण'ने उचललं 'हे' पाऊल; वाचा सविस्तर बातमी
तर संलग्न महाविद्यालयात ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असतानाही केवळ साडेचार कोटी रुपये दिले जाते. महाविद्यालयांना जास्त निधी दिला पहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य संजय चाकणे यांनीही महाविद्यालयासाठी कमवा शिका योजनेसाठीचा निधी अत्यल्प आहे, विद्यापीठाने हा निधी जास्त दिला पाहिजे, अशी मागणी टाकणे यांनी केली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा