एमबीएच्या धर्तीवर एम.कॉम.; विद्यापीठाने स्पेशलायझेशचे विषय वाढवले!

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 15 November 2020

- द्वितीय वर्षात स्पेशलायझेशन
- डिजिटल मार्केटिंग, इ काॅमर्स , बिझनेस प्रोसेसमध्ये स्पेशलायझेशन करता येणार 
- ई काॅमर्स  एम.काॅम ला प्रतिसाद नसल्याने हा अभ्यासक्रम बंद 

पुणे : 'एम.कॉम.' हा पारंपारिक अभ्यासक्रम असल्याने त्यातून उत्तम प्रकारचा रोजगार निर्माण होत नाही, पण याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे. एमबीए केल्यानंतर जसा रोजगार उपलब्ध होतो, तसा एम.कॉम. नंतर ही व्हावा यासाठी स्पेशलायझेशच्या विषयात वाढ केली आहे. डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स आदीचा समावेश यात केला आहे.

महत्त्वाची बातमी : UPSC, MPSC ट्रेनिंग सेंटरची परीक्षा पुणे विद्यापीठाने पुढे ढकलली​

पुणे विद्यापीठामध्ये साधे एम.कॉम.आणि ई-कॉमर्स एम एम.कॉम. असे दोन अभ्यासक्रम चालवले जात अभ्यासक्रम चालवले जात होते. या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 60 जणांची प्रवेश क्षमता होती. 2013 च्या सुमारास इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहारामध्ये होणारी वाढ याचा विचार करता पुणे विद्यापीठाने ई-कॉमर्स एम.काॅम. अभ्यासक्रम नव्याने सुरू केला होता. सुरुवातीची दोन वर्ष हा अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू होता, मात्र त्यानंतर तेथे मिळणारे शिक्षण आणि प्रत्यक्षात मार्केटची स्थिती यामध्ये भिन्नता असल्याने त्यामधून नोकरीची संधी कमी झाली.

गेल्या दोन-तीन वर्षापासून या अभ्यासक्रमाची विद्यार्थी संख्या 25 पेक्षा कमी झाली. त्यामुळे हा अभ्यासक्रम बंद करावा या दृष्टीने चर्चा सुरू झाली. त्यामुळे पुणे विद्यापीठातील वाणिज्य विभागाचे खच्चीकरण होत असल्याचा आरोपही माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आणि ई-कॉमर्स एम.कॉम बंद करण्यास त्यांनी विरोध केला.

कोरोना रुग्णांचे आशीर्वाद हीच दिवाळी भेट!​

पुणे विद्यापीठाने पारंपारिक एम.कॉम.मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार द्वितीय वर्षापासून विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनची संधी देण्यात आली. त्यामध्ये तिसऱ्या सेमिस्टरमध्ये तीन व चौथ्या सेमिस्टर मध्ये तीन असे सहा विषय स्पेशलायझेशनचे असणार आहेत. नुकत्याच झालेल्या पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेने मान्यता दिलेली आहे. याची अंमलबजावणी 2021-22 या शैक्षणिक वर्षात द्वितीय वर्षाला गेलेल्या विद्यार्थ्यांपासून केली जाणार आहे. 

हे आहेत स्पेशलायझेशनचा विषय

कॉर्पोरेट अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, बँकिंग अँड फायनान्स, डिजिटल मार्केटिंग अँड ई-कॉमर्स आणि बिझनेस प्रोसेस हे चार विषय स्पेशलायझेशन आहेत. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार एका विषयात स्पेशलायझेशन करू शकतील.

'कोसळलेल्या आभाळावर पाय देऊन उभे रहा, महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे!'

"ई-कॉमर्स एम.कॉम.या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे हा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्याऐवजी पारंपारिक एम.काॅम.ची प्रवेश क्षमता दुप्पट करून विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनद्वारे हेच विषय शिकता येणार आहेत. ज्याप्रमाणे एमबीए केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीची हमी वाढते, तसेच स्पेशल विषय घेऊन विद्यार्थ्यांनी एमकाॅम केल्यास नोकरीची संधी वाढेल."
- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा

ई-काॅमर्स एमकाॅम आवश्यकच 
सध्याचा काळ ई-काॅमर्सचा असताना पुणे विद्यापीठ ई काॅमर्स एमकाॅमच बंद करून टाकत आहे. हा निर्णय विद्यार्थी हिताचा नाही, जर विद्यार्थी संख्या कमी असेल, तर त्या अभ्यासक्रमात सुधारणा करून चांगले शिक्षक नियुक्त केले असते तर ही वेळ आली नसती. "
- सुरेश देवडे पाटील, माजी विद्यार्थी, पुणे विद्यापीठ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University tried to give a commercial look to MCom course