SPPU : पुणे विद्यापीठाची विनाकारण बदनामी थांबवा; सर्वोच्च अधिकाऱ्यांचा उद्वीग्न भावना

मुख्य इमारतीला आग आणि आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमाच्या परवानगी संदर्भातील वादामुळे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.
SPPU university
SPPU universityesakal

पुणे - विद्यापीठ हे समाजाचे आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन हवे. पण काही संघटना दोन ओळीचे पत्रही न देता, कार्यक्रमाचा आशयही स्पष्ट न करता. माध्यमांमध्ये विद्यापीठाला राजकीय आखाडा बनवत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असून, जी-२०च्या महत्त्वपूर्ण बैठकीचेही आयोजनही होत आहे.

अशा स्थितीत विद्यापीठाची बाजू न समजून घेता काही संघटनांकडून केवळ बदनामी करण्यात येत आहे, अशी उद्वीग्न भावना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अश्लील रॅप प्रकरण,

मुख्य इमारतीला आग आणि आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमाच्या परवानगी संदर्भातील वादामुळे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

SPPU university
Saree Market In Mumbai : सेल सेल सेल! मुंबईतल्या या मार्केटला मिळतात १०० ला चार साड्या!

त्यानंतर आता विद्यापीठातील काही विद्यार्थी संघटनांनी नाना पटोले यांना विद्यापीठात निमंत्रित केले आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध शैक्षणिक अडचणी तसेच वसतिगृह व मेसचा दर्जा, नवीन शैक्षणीक धोरण अशा विषयांवर नाना पटोले विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. हा कार्यक्रम १० मे रोजी होणार होता. विद्यार्थी संघटनांकडून कार्यक्रमासाठी सभागृह मिळावे, यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली होती.

त्याबाबत तीन मे रोजी कुलसचिवांना पत्र दिले होते. पण या कार्यक्रमाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. याबाबत प्र कुलगुरुंशी बोलणे झाले, त्यावेळी त्यांनी जी-२० कार्यक्रम असल्याने त्यादिवशी कार्यक्रमाला परवानगी मिळणार नाही, असे कळवण्यात आले. परंतु लेखी आम्हाला काहीही देण्यात आले नाही, असा आरोप विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना केला आहे.

या संदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना विचारले असता. ते म्हणाले, सर्व राजकीय नेतृत्त्व विद्यापीठासाठी मार्गदर्शक आहे. मात्र, कार्यक्रम नक्की कोणता होणार? त्यात आशय काय मांडला जाणार याची कल्पना आमच्याकडे लेखी आली नाही.

SPPU university
Mumbai : रेल्वे स्थानकात श्वानांची लसीकरण मोहीम

त्यात सध्या विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि जी-२०च्या तयारीसाठी कार्यरत आहे. कार्यक्रमासंदर्भात अधिक स्पष्टता आली की विद्यार्थी हिताचा आम्ही निर्णय घेऊ." विद्यापीठाच्या परीक्षा, शैक्षणिक कामकाज या बद्दल आम्हाला नक्की जाब विचारा, पण आशा विनाकारण वाद निर्माण करणाऱ्या घटनांतून विद्यापीठाची बदनामी थांबवावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थी हिताच्या कोणत्याही कार्यक्रमाला आमचा आक्षेप नाही. फक्त कार्यक्रमाचा आशय आम्हाला समजायला हवा. सध्या विद्यापीठ प्रशासन नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, जी-२० परीषदेच्या बैठकीचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आदींच्या आयोजनात व्यस्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विधायक असलेल्या कार्यक्रमाला आम्ही नाकारत नाही.

- डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com