‘भीमसेन जोशींचा नातू म्हणून दडपण’

नीला शर्मा 
शनिवार, 7 डिसेंबर 2019

यावर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गाण्याची संधी मिळणार, हे मी माझे भाग्य समजतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील जगभर गाजलेले नाव म्हणजे पंडित भीमसेन जोशी. त्यांचा नातू म्हणून या महोत्सवात गायला मिळणे, हे त्यांचेच आशीर्वाद. त्यांचा वारसा पुढे नेणारे माझे वडील  पं. श्रीनिवास जोशी यांनी गाण्याची तालीम दिली.

पुण्यात ११ डिसेंबरपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू होत आहे. या महोत्सवात कला सादर करणाऱ्या कलावंतांनी व्यक्त केलेल्या भावना आजपासून...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गाण्याची संधी मिळणार, हे मी माझे भाग्य समजतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील जगभर गाजलेले नाव म्हणजे पंडित भीमसेन जोशी. त्यांचा नातू म्हणून या महोत्सवात गायला मिळणे, हे त्यांचेच आशीर्वाद. त्यांचा वारसा पुढे नेणारे माझे वडील  पं. श्रीनिवास जोशी यांनी गाण्याची तालीम दिली. लहानपणी मी गाणं ऐकताना ताल धरायचो. एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनात ‘माझे माहेर पंढरी’ हा आजोबांच्या आवाजात घराघरात पोचलेला अभंग मी सादर केला. त्याचे खूप कौतुक झाले. मग बाबांनी मला शिकवायला सुरवात केली. पं. सुधाकर चव्हाण यांच्याकडूनही धडे घेतले. 

उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?

सवाईचा हीरक महोत्सव होता. तेव्हा दहा मिनिटे भजन गायची संधी मिळाली. तेव्हापासून अनेक कार्यक्रमांत सादरीकरणासाठी बोलावण्यात आले. धारवाड, इंदूर, उज्जैन, भोपाळ, कोलकाता, मुंबई, मिरज वगैरे बऱ्याच ठिकाणी गायलो. मध्यंतरी अमेरिकेत बाबांबरोबर निरनिराळ्या कार्यक्रमांत गायलो. मी आता अकरावीत आहे. 
वयाच्या सोळाव्या वर्षी ‘सवाई’त पदार्पण करायला मिळत असल्याचे दडपण वाटले तरी उत्साहही तेवढाच आहे. आजोबा आणि आई- बाबांच्या आशीर्वादाने मी नक्कीच उत्तम सादरीकरण करीन, असा विश्वास वाटतो. 

मोठ्या कलावंतासह सेवेचा आनंद
माझ्या आजोबांनी या महोत्सवात अनेक कलावंतांना संधी दिली. ‘सवाई’त कला सादर केल्याचा बहुमान कलावंतांना वाटतो. महोत्सवात पदार्पण करणाऱ्या कलावंतांना तर ही सुवर्णसंधी वाटते. मोठमोठ्या कलावंतांच्या उपस्थितीत सेवा देण्याचा आनंद असतो. प्रचंड संख्येने येणाऱ्या श्रोत्यांकडून दाद मिळते. इथे कला सादर केल्याच्या आठवणी थोर कलावंतांकडून सांगितल्या जातात. याबद्दल आई-बाबांकडून मी खूप ऐकत आलो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sawai gandharv bhimsen mahotsav