sawai gandharv bhimsen mahotsav
sakal
- सायली पानसे-शेल्लेकरी
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या मंचावर किराणा घराण्याच्या कलाकारांचा मान निश्चितच मोठा आहे. महोत्सवाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या सत्राची सुरुवात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने झाली. ‘कोमल ऋषभ आसावरी’ रागात सुरेल, शांत आलापी, रागाचा भाव व्यक्त करणारी गायकी, बोल आलाप, सरगम, तानांमुळे रागाचा अपेक्षित परिणाम साधला.