‘सवाई’चा स्वरसोहळा आजपासून!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - गेली अनेक वर्षे पुण्याच्या मध्यवस्तीत रमणबागेत रंगणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा प्रथमच अन्यत्र होत आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे उद्यापासून (ता. १२) स्वरलयींचा हा सोहळा रंगणार आहे. पाच दिवस म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात रसिकांना अनेक ज्येष्ठ आणि युवा कलाकारांना ऐकता येणार आहे. 

यंदा महोत्सवामध्ये ३१ कलाकार त्यांचे कलाविष्कार सादर करतील. यामध्ये देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा कलाकारांचा सहभाग असेल. यात रवींद्र परचुरे, बसंत काब्रा, प्रसाद खापर्डे, परवीन सुलताना, डॉ. रिता देव, सौरभ साळुंखे, राहुल शर्मा, पंडित अजय पोहनकर, अपर्णा पणशीकर, रागी बलवंत सिंग, मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर, पं. उल्हास कशाळकर, दत्तात्रय वेलणकर, सावनी शेंडे, विवेक सोनार, श्रीनिवास जोशी, देवकी पंडित, पं. गोस्वामी गोकुलोत्सव महाराज, उस्ताद शाहीद परवेज, अर्शद अली व अमजद अली, अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, निर्मला राजशेखर, इंद्रदीप घोष, संजीव अभ्यंकर, प्रतीक चौधरी, पं. बिरजू महाराज, शास्वती सेन, डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश आहे.

महोत्सवाची वेळ 
    १२ डिसेंबर - दुपारी ३ ते रात्री १० 
    १३, १४ डिसेंबर - दुपारी ४ ते रात्री १०
    १५ डिसेंबर - दुपारी ३ ते रात्री १२ 
    १६ डिसेंबर - दुपारी १२ ते रात्री १० 

महोत्सव या वर्षी नवीन जागेत होत आहे. परंतु, रमणबागेपेक्षा ही जागा खूपच मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक रसिकाला आस्वाद घेता येईल. तसेच दाटी होणार नाही. पार्किंगसाठीदेखील पुरेशी जागा असल्याने गैरसोय टळणार आहे. सुमारे बारा हजार रसिक बसतील एवढी बैठक व्यवस्था आहे. आतापर्यंत रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रथमच नव्या जागेत होणारा हा सोहळा दिमाखदार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.  
- श्रीनिवास जोशी

Web Title: Sawai Gandharva Bhimsen Mahotsav