पदार्पणाची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पतियाळा घराण्याचा तालीमदार, जोरकस गायकी जपणारा सौरभ साळुंखे हा तरुण गायक. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथम पदार्पणाच्या संधीमुळे तो सध्या भारलेल्या अवस्थेत आहे. हैदराबादच्या निजामांकडे राजगायक असलेल्या पूर्वजांच्या कामगिरीचा वारसा पुढे न्यायची जबाबदारी पेलतानाच चित्रपट व अल्बमसाठी गाण्याचे त्याचे प्रयत्नही यशस्वी होताना दिसत आहेत. 

पतियाळा घराण्याचा तालीमदार, जोरकस गायकी जपणारा सौरभ साळुंखे हा तरुण गायक. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथम पदार्पणाच्या संधीमुळे तो सध्या भारलेल्या अवस्थेत आहे. हैदराबादच्या निजामांकडे राजगायक असलेल्या पूर्वजांच्या कामगिरीचा वारसा पुढे न्यायची जबाबदारी पेलतानाच चित्रपट व अल्बमसाठी गाण्याचे त्याचे प्रयत्नही यशस्वी होताना दिसत आहेत. 

प्रश्न - तुझ्या घरातल्या सांगीतिक परंपरेविषयी सांग... 
सौरभ -
 शास्त्रीय संगीत हेच सर्वस्व असणाऱ्या घराण्यातली माझी पंधरावी पिढी. माझ्याही जगण्याचा केंद्रबिंदू संगीतच आहे. माझे वडील पंडित प्रकाशसिंहजी साळुंखे यांच्याकडून मिळालेलं संचित हा मला मिळालेला फार मोठा खजिना आहे. त्यांनीच मला तयार केलं. स्वतःबरोबर देशभर दौऱ्यांना नेलं. तालीम, रियाझ यांच्याव्यतिरिक्त थेट सादरीकरणाच्या माध्यमातून मला त्यांच्याकडून खूप शिकता आलं. ते सवाईत गायलेले आहेत. मलाही इथं सेवेची संधी मिळावी, आशीर्वाद लाभावेत अशी त्यांची इच्छा होती. ती पूर्ण व्हायचे क्षण जवळ आले आहेत. त्यांना व रसिकांनाही समाधान देऊ शकेल असं गाणं माझ्याकडून व्हावं यासाठी प्रार्थना आणि प्रयत्न करतो आहे.

प्रश्न - शास्त्रीय संगीताबरोबरच चित्रपट आणि अल्बमसाठी भरारी कशी घेतलीस? 
सौरभ -
 वडिलांच्या पाठबळामुळेच ते घडलं. त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारचं गाणं करायचं होतं, पण आजोबांनी तसं करू दिलं नाही. राजगायकाच्या वंशजानं विशुद्ध गाणंच फक्त करावं, असा आजोबांचा आग्रह होता. उपशास्त्रीय संगीतातील ठुमरी, टप्पा, दादरा आदींचे संस्कार वडिलांकडूनच माझ्यावर झाले आहेत. चित्रपट, मालिका, अल्बमसाठी गाण्याची संधी मिळाली. ‘बारायण’ चित्रपटासाठी गायलो. ‘मुळशी पॅटर्न’मधलं माझं ‘आभाळ आभाळ’ लोकप्रिय झालं. कलर्स वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या टायटल ट्रॅकसाठी गायलो. ते सध्या श्रोत्यांच्या पसंतीला उतरतं आहे. शास्त्रीय संगीत गाताना पूर्णपणे तेच असावं, त्यात उणेपणा नको. इतर प्रकार गाताना त्यांना पुरेपूर न्याय द्यावा, हा विचार जपतो. अनेक स्पर्धांमधून विजेता गायक ठरलो आहे. सवाईत वर्षानुवर्षे भक्तिभावानं ऐकायला येत राहिलो आहे. इथं गाण्याची संधी मिळणं हे माझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

Web Title: Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Saurabh Salunkhe