सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदें आक्रमक; ३ डिसेंबरला पुण्यात काढणार मोठा मोर्चा, 'अदानी ग्रीन एनर्जी'ला ब्लॅकलिस्ट करण्याचीही मागणी

Sayaji Shinde Protests Tree Cutting : या प्रकरणी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीवर कठोर कारवाई करून तिला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच संबंधित प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणीही केली आहे.
Sayaji Shinde

Sayaji Shinde

esakal

Updated on: 

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वीज प्रकल्पांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भीमाशंकर आणि तारळी येथील पंप स्टोरेज वीज प्रकल्पांसाठी दुर्मिळ झाडांची कत्तल सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीवर कठोर कारवाई करून तिला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच संबंधित प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणीही केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories