
Sayajirao Gaekwad Maharaj Death Anniversary : बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं आणि पुण्याचं नातं तसं जूनं आहे. पुण्यातल्या अनेक दिग्गज कलाकारांना त्यांचा राजाश्रय सुद्धा मिळालेला होता. त्यामुळे महाराज गुजरात मधल्या बडोद्याचे असले तरी नाळ मात्र आपल्या पुण्याशी जोडलेली आहे. पुण्याच्या ऐतिहासिक वारस्यांचा विचार करताना लोकमान्य टिळक राहत असलेला, केसरी वृत्तपत्राचा जन्म जिथे झाला तो केसरी वाडा महत्वाचा ठरतो. पण तुम्हाला माहितीये का हा वाडा मूळचा गायकवाड वाडा आहे. जाणून घ्या रोमांचक इतिहास.
बडोदा संस्थानचे महाराज म्हणजे सयाजीराव गायकवाड. तस बघायला गेलं तर इथल्या कोणत्याही भूभागाव्रर राजकीयदृष्ट्या त्यांची कोणतीही सत्ता नव्हती.असे असतानाही महाराष्ट्राची जनता त्यांना मनोमन आपला राजा मानत होती. महाराष्ट्राच्या जनतेचे आपण काही देणे लागतो असे सयाजीरावांनी त्यांच्या महाराष्ट्रीयत्वामुळे वाटत होते.
महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांना त्यांनी मदत केली. विशेषतः पुण्याशी त्यांचे जवळकीचे नाते होते. बडोद्याहून पुण्याला त्यांच्या अनेक भेटीगाठी व्हायच्या.
रायगडावरील शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्याचे टिळकांनी ठरवले तेव्हा या कार्यासाठी सर्वात मोठी निधी सयाजीराव गायकवाडांनी पाठवली होती. इतके असले तरी महाराजांच्या कारभाराकडे आणि तिथल्या समाजसुधारणांकडे टिळकांचे केसरी मधून लक्ष असे आणि वेळप्रसंगी त्यावर निर्भीड टीका देखील केली जात असे.
राजकीय वास्तवाचे भान असल्यामुळे सयाजी महाराजानी टिळकांसोबत थेट भेटीगाठी घेतल्या नाहीत. त्यांच्या कार्याबद्दल सहानुभूती मात्र होती. या सहानुभूती मधूनच नारायण पेठेत असलेला गायकवाड वाडा टिळकांना हवा असल्याचे कळताच महाराजांनी तो मोफत देण्याची तयारी केली. मात्र तसे करणे सार्वभौम सत्तेच्या प्रतिनिधींना आवडणार नाही म्हणून लोकमान्य देऊ शकतील ती किंमत ठरवण्यात आली.
पुण्यात पहिला लॉ क्लास सुरु केला. या क्लासमुळे आर्थिक सुबत्ता आली व टिळकांनी स्वतःसाठी व केसरी वृत्तपत्राची कामे करता यावीत म्हणून गायकवाड वाडा विकत घेतला.
पुण्यात पहिला लॉ क्लास सुरु केला. या क्लासमुळे आर्थिक सुबत्ता आली व टिळकांनी स्वतःसाठी व केसरी वृत्तपत्राची कामे करता यावीत म्हणून गायकवाड वाडा विकत घेतला.
राष्ट्रीय चळवळीचे मुख्य केंद्र गायकवाड वाडाच बनला होता. इंग्रज सरकारला थरकाप भरवणारे अग्रलेख याच वाड्यात लिहिले गेले. पुढंच संपूर्ण आयुष्य टिळकांनी याच वाड्यात व्यतीत केलं.
टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी केलेले सामाजिक प्रयोगाची नांदी देखील याच गायकवाड वाड्यात घडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.