Pune | सय्यदनगर - महमंदवाडी रस्ता रुंदीकरणाला मुहूर्त कधी मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनचालक आणि पादचारी त्रासले – विरुद्ध दिशेने येणारी वाहने आणि रस्ते खोदाई ठरते डोकेदुखी

Pune : सय्यदनगर - महमंदवाडी रस्ता रुंदीकरणाला मुहूर्त कधी मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सय्यदनगर-महंमदवाडी रस्ता एकेरी केली असला तरी, अरुंद रस्ता, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, अतिक्रमणे आणि वेगवेगळ्या कारणासाठी वारंवार रस्त्याची खोदाई केली जात असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाने वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून रस्ता डांबरीकरण करावे आणि वारंवार रस्ते खोदाईला परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

सय्यदनगर रेल्वे गेटपासून महमंदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची वारंवार खोदाई करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, रस्ता रुंदीकरण करावे यासाठी अमित घुले, विजय घुले, नागेश झेंडे, रोहित मोरे, युवराज जगताप, किसन सनके यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये वारंवार निवेदन देऊनही अद्याप कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: औरंगाबाद : आंध्रातून ४० किलो गांजा मागविणारा अखेर अटकेत

रेल्वे गेटवर उड्डाण पुलाऐवजी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, या रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्री-अपरात्री पादचारी आणि दुचाकीचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्यावर विद्युत दिव्यांची व्यवस्था करून पादचाऱ्यांची गैरसोय टाळावी. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, असा सूर नागरिकांनी आळवला आहे.

दरम्यान, मागिल दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच कामे ठप्प झाली होती. नागरिक, लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्याबाबत तोडगा काढला जाईल, या रस्त्याची पाहणी करून हे काम मुख्य खात्याकडे असेल, तर त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त काटकर यांनी सांगितले.

loading image
go to top