पुणे जिल्ह्यातील गावात सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर मिरवणुकीत पाडला नोटांचा पाऊस

सदाशिव आमराळे
Thursday, 25 February 2021

दावडी (ता. खेड) येथील विजयी उमेदवार व समर्थकांनी सरपंच व उपसरपंच यांना निवडणुकीनंतर  हार घालण्यासाठी क्रेनचा वापर केला तर फोटोसेशन जेसीबीवर केले. कहर म्हणजे एका कार्यकर्त्याने चक्क नोटांची उधळण करत आनंद व्यक्त केला.

दावडी : सरपंचपदाची निवडणुक म्हणलं की नेते व कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येते. विजयी उमेदवार आनंद साजरा करण्यासाठी पेढे वाटतात किंवा विजयी उमेदवारांची गावात-वाजत गाजत मिरवणुक काढली जाते. मात्र याही पुढे जाऊन दावडी (ता. खेड) येथील विजयी उमेदवार व समर्थकांनी सरपंच व उपसरपंच यांना निवडणुकीनंतर हार घालण्यासाठी क्रेनचा वापर केला तर फोटोसेशन जेसीबीवर केले. कहर म्हणजे एका कार्यकर्त्याने चक्क नोटांची उधळण करत आनंद व्यक्त केला.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या 

दावडी येथे बुधवार (ता. २४ रोजी) सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणुक झाली. या निवडणुकीमध्ये सरपंचपदी संभाजी घारे व उपसरपंचपदी राहूल कदम बिनविरोध निवडले गेले. निवडणुक झाल्यावर उत्साही कार्यकर्त्यांनी मोठा हार आणून क्रेनच्या सहाय्याने तो हार सरपंच व उपसरपंचांना घालण्यात आला. एका कार्यकर्त्याने नोटांचे बंडल काढून पैशांची उधळण केली.

यावेळी जेसीबीच्या बकेटमध्ये सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांना बसवून फोटोसेशन करण्यात आले. यावेळी अनेक पोती गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर चौकातून महालक्ष्मी मंदीरापर्यंत जेसीबीच्या दणदणाटात जल्लोषात मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीचे, नोटा उधळण्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले अाहेत. 

पूजा चव्हाण मृत्यू : दोघं कुठं गेले? घटनेनंतर दिली होती कबुली; चित्रा वाघ यांचा खुलासा

जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सोशल डिस्टन्सींग पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र दावडी येथील मिरवणुकीत सुमारे एक हजार कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच डिजेला परवानगी नसली तपी दावडी येथील मिरवणुकीत डिजेचा वापर करण्यात आला. निवडणुक प्रक्रियेदरम्यान पोलीस उपस्थित होते, मात्र नेमके मिरवणुकीच्या वेळीच पोलीस कसे काय निघून गेले याचीही चर्चा सुरू आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scattering of notes after sarpanch election