पीएमपीच्या थांब्यांवर १० दिवसांत वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

 भाडेतत्त्वावर घेतलेल्या; परंतु वारंवार बंद पडणाऱ्या पीएमपी बस मार्गावर न पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने गुरुवारी घेतला. तसेच शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील सर्व बसथांब्यांवर येत्या १० दिवसांत वेळापत्रक लावण्याचेही जाहीर करण्यात आले. 

पुणे - भाडेतत्त्वावर घेतलेल्या; परंतु वारंवार बंद पडणाऱ्या पीएमपी बस मार्गावर न पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने गुरुवारी घेतला. तसेच शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील सर्व बसथांब्यांवर येत्या १० दिवसांत वेळापत्रक लावण्याचेही जाहीर करण्यात आले. 

पीएमपीच्या ताफ्यात स्वतःच्या १३६१ बस असून, भाडेतत्त्वावरील ५७७ व इलेक्‍ट्रिक २५ बस आहेत. त्यातील भाडेतत्त्वावरील सुमारे २० टक्के बस दररोज ‘ब्रेक डाउन’ होत आहेत. गर्दीच्या वेळी प्रमुख रस्त्यांवर सुस्थितीतीतल बस पाठविण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले. खडकी, साप्रस, औंध, औंध गाव, रेंजहिल्स, बोपोडी, बाणेर आदी भागांत बस वाहतूक सुरू करण्याबाबत येत्या १५ दिवसांत सर्व्हे करण्याचा निर्णय झाला. तसेच, खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मदतीने नव्याने ‘बीओटी’ तत्त्वावर खडकी बसस्थानक विकसित करण्याबाबत प्रस्तावाला चालना देण्याचेही या वेळी ठरले. 

नव्याने समाविष्ट होणाऱ्या ४०० सीएनजी बससाठी नवी दिल्लीच्या ‘डीटीडीसी’ धर्तीवर गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण व पीएमपीएमएलच्या वास्तूत स्पेअर स्पार्ट शॉप सुरू करण्याबाबत चर्चा झाली. आमदार विजय काळे यांच्यासमवेत पीएमपीच्या अध्यक्ष नयना गुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनील बुरसे, अनंत वाघमारे, निरंजन तुळपुळे आदी उपस्थित होते. 

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय 
  शहर व पिंपरी- चिंचवडमधील अनावश्‍यक बसथांबे कमी करणार 
  सुट्या भागांना बारकोडिंग करणार 
  उत्पादक कंपन्यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार 
  जाहिरात दरातील तफावत दूर करणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schedule in 10 days at PMP stops