दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक ठरले, पण बॅकलॉगच्या परीक्षेचे काय ?

The schedule for the second session was decided but what about the backlog exam
The schedule for the second session was decided but what about the backlog exam

पुणे : "आमचे यावर्षीचे दुसरे सत्र जानेवारी महिन्यात सुरू होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे, सध्या सुरू असलेल्या सत्रातील केवळ 40 ते 50 टक्केच अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवून पूर्ण झाला आहे. पूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होईल का हा प्रश्‍न आहेच. पण गेल्या वर्षीच्या बॅकलॉगच्या परीक्षांचे विद्यापीठ काय करणार आहे?, ही परीक्षा कशी घेतली जाईल. याबाबत लवकर स्पष्टता आली पाहिजे. नाही तर पुन्हा गोंधळ होईल, असे इंजिनियरींच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा गणेश कुलकर्णी सांगत होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा सध्या घेतली जात आहे. पण यामध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमधून मार्ग काढताना विद्यापीठाची चांगलीच दमछाक झाली आहे. तसेच पदवी, पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाची तर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या, तिसऱ्या चौथ्या वर्षातील पहिले सत्रही अंतिम टप्प्यात आले आहे. विद्यापीठातर्फे शिकवले जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचे पहिले सत्र डिसेंबर महिन्यात संपणार असून, ते दुसरे सत्र 1 जानेवारी 2021 पासून सुरू केले जाणार आहे. विद्यापीठाने अंतिम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला. पण यामध्ये बॅगलॉगच्या विषयांचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत परीक्षा घेतली जाईल असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले होते. ही मुदत देखील संपत आली आहे. पण बॅगलॉगच्या परीक्षा कशा घेतल्या जाणार याबाबत स्पष्टता नाही.

बीएससी द्वितीय वर्षात शिकणारा सूरज म्हाळंगे म्हणाला, ""बॅगलॉगची परीक्षा 120 दिवसात घेणार असे सांगण्यात आले होते, पण अजून याबाबत नियोजन नाही. आधी बॅकलॉगची परीक्षा घ्यावी व त्यानंतर नियमित सत्राची परीक्षा झाली पाहिजे. तसेच ही परीक्षा असाईनमेंट बेस घेतल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.''

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

परीक्षातर होणार पण पद्धत कोणती
विद्यीपाठ कायद्यामध्ये बॅगलॉगच्या विषयांची परीक्षा घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे परीक्षा होणार असली तरी ती विद्यापीठ स्तरावर होणार की महाविद्यालये घेणार?, ऑफलाइन होणार की ऑनलाइन?, "एमसीक्‍यू घेणार की असाईनमेंट बेस' असे प्रश्‍न विद्यार्थ्यांकडून विचारले जात आहेत. दरम्यान, विद्यापीठाची विद्या परिषदेची बैठक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामध्ये याबाबत प्रस्ताव येऊन निर्णय होऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

"अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाच्या/सत्राच्या नियमित परीक्षांसह बॅगलॉगच्या परीक्षांचे कशा घ्याव्यात याबाबत येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये निर्णय होईल. त्यानंतर परीक्षा विभागामार्फत या परीक्षा घेतल्या जातील.''
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 

- अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे साडेपाच लाख
- सुमारे 45 टक्के विद्यार्थ्यांचे विषय बॅगलॉग
- सध्या सुरू असलेल्या सत्राचा सरासरी 50 टक्के अभ्यासक्रम शिकवून पूर्ण
- अंतिम वर्षानंतर द्वितीय, तृतीय व चौथ्या वर्षाची परीक्षेच्या नियोजनाचे आव्हान


दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक
अभ्यासक्रम - सत्र सुरूवात - सत्र समारोप
विज्ञान - 1 जानेवारी - 15 मे
अभियांत्रीकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्‍चर (पदवी) - 1 जानेवारी - 15 मे
अभियांत्रीकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्‍चर (पदव्युत्तर) - 19 जानेवारी - 31 मे
वाणिज्य, कला - 1 जानेवारी - 15 मे
विधी पदवी/पदव्युत्तर - 19 जानेवारी - 31 मे
बीएड, एमएड, बीपीएड, एमएड - 19 जानेवारी - 31 मे
व्यवस्थापन - 19 जानेवारी - 31 मे

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com