विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

दहावीच्या विद्यार्थ्यांना 15 हजार तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये अर्थसाह्य दिले जाईल. अशा सुमारे पावणेआठ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. 

पुणे - दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात पुढील आठवडाभरात जमा होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना 15 हजार तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये अर्थसाह्य दिले जाईल. अशा सुमारे पावणेआठ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. 

यासाठी विद्यार्थ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात सुमारे दहा हजार 813 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील 9 हजार 954 विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रत महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आणि समाज विकास विभागात जमा केली आहे. त्यापैकी सात हजार 879 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्याची तयारी केली असून, या विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर (डीबीटीद्वारे) ती होईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सांगितले. पुढच्या टप्प्यात उर्वरित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत, त्यातील तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मिळणारा लाभ या पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षी सुसूत्रता आणण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होणार नाही, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा - ओवेसींनी शाहीनबागला जोडलं जलियाँवाला बागशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scholarship amount will be deposited in the student bank account