सावित्रीच्या लेकींना लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्तीचे वाटप

पुणे - अभियांत्रिकी, फार्मसी आणि नर्सिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना लीला पूनावाला फाउंडेशनने नुकतीच शिष्यवृत्ती प्रदान केली.
पुणे - अभियांत्रिकी, फार्मसी आणि नर्सिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना लीला पूनावाला फाउंडेशनने नुकतीच शिष्यवृत्ती प्रदान केली.
Updated on

पुणे - अभियांत्रिकी (पदवी ४ वर्ष किंवा डिप्लोमानंतर), फार्मसी आणि नर्सिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या ७५० हून अधिक विद्यार्थिनींना लीला पूनावाला फाउंडेशनने (एलपीएफ) नुकतीच शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. पुण्यातील गुणवंत परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. गुणवत्तेसह गरज या निकषावर एलपीएफ गरजू मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविड -१९  च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले प्रतिबंधक प्रोटोकॉल लक्षात ठेवून यावर्षी शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन तीन दिवसांत आणि ६ कार्यक्रमांमध्ये करण्यात आले होते. एलपीएफचे कॉर्पोरेट भागीदार, विश्वस्त मंडळ आणि शिष्यवृत्ती निवड समिती सदस्यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती  देऊन गौरविण्यात आले.

यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा पूनावाला म्हणाल्या की, २५ व्या वर्षांत पदार्पण करत एलपीएफ ने ११,००० पेक्षा जास्त मुलींच्या सशक्तीकरणाचा टप्पा गाठला आहे. आमचे कॉर्पोरेट भागीदार आणि हितचिंतकांच्या योगदानाशिवाय हे शक्य झाले नसते. या कॉर्पोरेट भागीदारांनी प्रोजेक्ट फंडिंगच्या पलीकडे जाऊन मुलींसाठी सर्वसमावेशक भागीदारी, त्यांच्या कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा, अनुभवींचे मार्गदर्शन आणि इंटर्नशिप प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून दिल्या. एलपीएफला भारताच्या नकाशावर बघण्याचे आमचे स्वप्न आहे. जेणेकरून पात्र मुलींना व्यावसायिक शिक्षण आणि करिअरच्या आकांक्षा बाळगण्याची संधी मिळेल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com