esakal | शिष्यवृत्तीसाठी थांबा अन् थांबाच!

बोलून बातमी शोधा

Scholarship}

देशाची सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगीक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) ढिसाळ कारभारामुळे संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑफलाइन असलेल्या या प्रक्रियेमुळे शिष्यवृत्ती मिळण्यास दिरंगाई होते.

pune
शिष्यवृत्तीसाठी थांबा अन् थांबाच!
sakal_logo
By
सम्राट कदम

‘सीएसआयआर’च्या कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका
पुणे - देशाची सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगीक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) ढिसाळ कारभारामुळे संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑफलाइन असलेल्या या प्रक्रियेमुळे शिष्यवृत्ती मिळण्यास दिरंगाई होते. अनेकदा कागत्रपत्रेही गहाळ होत असल्याचे संशोधक विद्यार्थी सांगतात. लवकरच ही प्रक्रीया ऑनलाइन करत आहोत, असा दावा ‘सीएसआयआर’ने केला आहे. देशभरातील विद्यार्थी पीएचडीसाठी राष्ट्रीय पात्रता परिक्षा (नेट) देतात. विज्ञान शाखेची ही परिक्षा ‘सीएसआयआर’ घेते. याच परिक्षेत मेरीटमध्ये आल्यास विद्यार्थ्याला कनिष्ठ संशोधक शिष्यवृत्ती प्राप्त होते. पीएचडीसाठी मार्गदर्शक आणि संशोधन संस्था निश्चित झाल्यावर विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सीएसआयआरकडे दिल्लीला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागतो. त्यानंतर सीएसआयआर सर्व कागदपत्रांची तपासणी करून विद्यार्थी, मार्गदर्शक आणि संशोधन संस्थेला एक क्रमांक देते. त्या आधारावर विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, बऱ्याचदा ही प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी चार महिन्यांचा वेळ घेत असल्याचे दिसते. पुण्यातील आयसरच्या एका संशोधक विद्यार्थ्याने नोव्हेंबर महिन्यातच अर्ज केला आहे. मात्र आजपर्यंत त्याची शिष्यवृत्तीची प्रक्रीया कुठवर आली, हे कळण्यास कोणताही मार्ग नाही. त्याने ‘सीएसआयआर’च्या मदत कक्षालाही इ-मेल केला असून, मागील महिन्याभरात त्याला साधे प्रती उत्तरही आलेले नाही. तर, दुसऱ्या एका विद्यार्थ्याला मागील तीन महिन्यांपासून शिष्यवृत्तीच प्राप्त झालेली नाही. अशा समस्या सोडविण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप केला असून, रोज अशा असंख्य तक्रारी पडत आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी ट्वीटर अभियानही राबविले होते.

मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु

संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्या 

  • शिष्यवृत्तीसाठी पाठविलेले अर्जाची प्रक्रीया वेळेत पूर्ण न होणे
  • शिष्यवृत्ती दोन ते तीन महिने उशिरा येते
  • मदत कक्षाने प्रती उत्तर न देणे
  • अर्जाचे कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन ट्रेकिंग होत नाही
  • पोस्टाने पाठविलेले कागदपत्रे गहाळ झाल्यास थेट दिल्लीला जावे लागते

३९ - ‘सीएसआयआर’च्या देशभरातील प्रयोगशाळा
८००० - शिष्यवृत्तीप्राप्त संशोधक विद्यार्थी (अंदाजे) 
५०० ते ६०० - शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी येणारे अर्ज 
५ वर्षे - शिष्यवृत्तीचा कालावधी
३५ हजार - वरिष्ठ संशोधक शिष्यवृत्ती 
३१ हजार - कनिष्ठ संशोधक शिष्यवृत्ती 

भोरमध्ये शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप; एजंटांचे फोन करतायत हैराण

संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन सिस्टम विकसित करण्यात आली आहे. सध्या सीएसआयआरच्या तीन प्रयोगशाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्याचे कार्यान्वयन करण्यात आले असून, पुढील काही महिन्यात सर्व समस्यांचे निराकरण होईल. 
- डॉ. शेखर मांडे, महासंचालक, सीएसआयआर.

प्रत्येक महिन्याला सीएसआयआरकडे हजेरी पत्रक आणि इतर कागदपत्रे पाठवावे लागता. काहीवेळा ते गहाळपण होते. अशावेळी दिल्लीला जाऊन भेटावे लागते. तसेच शिष्यवृत्तीची प्रक्रीया कुठवर आली हे कळायला कोणतीच सोय नाही. 
- संशोधक विद्यार्थी, भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे.

Edited By - Prashant Patil